मलकापूर : सहापदरीकरणासाठी मलकापूरात केलेल्या बॅरिकेटींगमुळे वाहतूककोंडी होत असते. मात्र सातारा कोल्हापूर लेनवर कंटेनर पलटी झाल्याने चार किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जॅम झाले होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर येथील गंधर्व हॉटेलजवळ बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पलटी झालेला कंटेनर रस्त्यावरच असल्यामुळे नऊतास वाहतूककोंडी झालो होती. मलकापूरात महाराष्ट्र दिनानिमित्त बाहेर पडलेल्यांची सकाळ वाहतूक कोंडीतच गेली. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत होती.
बुधवारी पहाटे पूर्वेकडील उपमार्गावरील सातारा-कोल्हापूर लेनवर कंटेनर पलटी झाल्याने ट्रॅफिक जॅम झाले होते. रस्ता अरूंद आणि वाहनांची वरदळ व त्यातच कंटेनर पलटी झाल्याने मलकापूरात वाहातूक कोंडी होऊन या लेनवर चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तर आज महाराष्ट्र दिनासाठी बाहेर पडलेल्यांना वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला. कोल्हापूरनाका ते मलकापूरफाटा परिसरात वाहतूक वळवलेल्या ठिकाणची वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागत होती.
उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यापासून कांही कामानिमित्त उपमार्गावरून जायचे म्हटले की अंगावर काटाच उभा राहतो. अशी भावना स्थानिक नागरिकांची झाली आहे. बुधवारी पहाटे कंटेनर पलटी झाल्याने पहाटेपासूनच महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या ट्रॕफिकमध्ये कांही रूग्णवाहिकाही अडकून पडल्या होत्या.
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
पेन्शनर वयोवृद्धाला ठकवणार्या भामट्याला सातारा पोलिसांकडून अटक |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |