09:14pm | May 13, 2024 |
सातारा : सहाय्यक धर्मादाय आयुक्तातील अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराबाबत सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातार्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. परंतु त्यावेळी प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले होते. आता याच कार्यालयातील कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. त्यामुळे आम्ही केलेले आंदोलन योग्यच होते, हे यावरुन स्पष्ट होत आहे. आता तरी या कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशी न करता त्यांना प्रसंगी अटकही झाली पाहिजे, अशी मागणी सातार्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात असे म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील सहा. धर्मादाय आयुक्त या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मनमानी कारभार करत आहेत. जाणीवपूर्वक त्रास देणे, मनमानीपणे तारखा देणे, विनाकारण पक्षकारांचे प्रस्ताव नामंजूर करणे, आर्थिक तडजोडी करणे, त्या न झाल्यास फौजदारी कारवाई करण्याचे सांगितले जाते आहे. याबाबत या कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांची खातेनिहाय सखोल चौकशी करून, पक्षकार, सामाजिक संस्था, संघटना यांना न्याय द्यावा. संबंधीत सहाय्यक धर्मादाय आयुक्त आणि या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी सातार्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी 1 डिसेंबर 2023 ला जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन केले होते. त्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले होते.
आता याच कार्यालयातील कर्मचारी लाच स्वीकारताना लाचलुचपत अधिकार्याच्या जाळ्यात सापडला आहे. त्यामुळे आमच्या तक्रारीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले त्याचेच हे फळ आहे. आता या सापडलेल्या कर्मचार्याची कसून चौकशी झाली पाहिजे. त्याच्याआडून धर्मादाय आयुक्त कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकार्याचीसुध्दा चौकशी झाली पाहिजे. कारण ज्या पदावर सदर व्यक्ती काम करत आहे, मिळणारा हिस्सा सुध्दा त्या व्यक्तीकडे पोहोच होत असणार, अशी शंका सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे उच्चपदस्थ अधिकार्यांच्या चौकशीवर न थांबता संबंधित उच्चपदस्थ अधिकार्यांनासुध्दा अटक झाली पाहिजे, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
आम्ही केवळ लोकांच्या सांगण्यावरुन एखाद्या विरोधात आंदोलन करत नाही, तर तक्रार आल्यानंतर माहिती अधिकारातंर्गत माहिती गोळा करतो. त्यात तथ्य आढळले तरच आंदोलन करतो. विनाकारण कोणालाही त्रास देत नाही, हे या प्रकरणावरुन पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, पत्रकार पद्माकर सोळवंडे यांनी व्यक्त केली आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |