सातारा : येथील न्यायालयासमोर मंगळवारी सकाळी 10.30 च्या सुमारास एका इलेक्ट्रिक दुचाकीची जिल्हा न्यायाधीशाच्या वाहनाला समोरून धडक बसली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून, दुचाकीचालक पालकर हा जखमी झाला आहे. त्याला नागरिकांनी रिक्षात बसवून उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पालकर हा इलेक्ट्रिक दुचाकीवरून पोवई नाक्याकडून जिल्हा परिषदेच्या दिशेने जात होता.त्यावेळी न्यायालयात निघालेल्या न्यायाधीशाचे खाजगी वाहन रस्ता दुभाजकाच्या मधोमध थांबले होते. वाहतूक पोलिसांनी पालकरला दुचाकी थांबण्याच्या सूचना केली. मात्र, पोलिसांची नजर चुकवून, पालकरने गाडी पुढे नेली. त्यावेळी न्यायाधीशाच्या गाडीला दुचाकीची धडक बसली.