सातारा : मी कोषागार कार्यालयातून बोलतोय, असे सांगून 67 वर्षीय पेन्शनर वृद्धाला ठकवणार्या भामट्याला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. शिवम चौगुले या बनावट नावाने फिर्यादीची 71 हजार 900 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या संशयिताला सातारा शहर पोलिसांनी तात्काळ 24 तासाच्या आत तपास करून गजाआड केले आहे.
याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी सतीश ज्ञानदेव चोरगे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्या प्रकरणी फिर्याद दाखल केली होती. शोएब अश्फाक शेख वय 28, रा. 411 करंजे तर्फ, सातारा याने हॉस्पिटल सातारा येथे शिवम चौगुले या बनावट नावाने चोरगे यांच्याशी संपर्क केला. मी ट्रेझरी ऑफिस मधून बोलत आहे, असे सांगून पेन्शन फरकाचे पैसे मिळणार असल्याचे सांगत वाढीव पेन्शनचे पैसे तात्काळ भरा, असे सांगितले. या तर्हेने त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने 81 हजार 900 रुपये काढून घेतले. ऑनलाइन सेवा देणार्या शॉप मधून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान तयार झाले होते.
सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तात्काळ दोन पथके तैनात करून तपासाला सुरुवात केली. मोबाईल नंबर च्या तांत्रिक विश्लेषणानंतर शोएब अशफाक शेख याला 14 मे रोजी सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी केली असता तोच शिवम चौगुले या बनावट नावाने फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली आहे. ऑनलाइन फसवणुकीचा अत्यंत संवेदनशील गुन्हा सातारा पोलिसांनी झटपट उघडकीस आणला.
या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक एन बी तांबे, पोलीस उपनिरीक्षक एस बी मोरे, पोलीस हवालदार एस एस देशमुख, राहुल घाडगे, सुजित भोसले, निलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, अजिंक्य माने, तुषार भोसले, संतोष घाडगे, इरफान मुलाणी, सुशांत कदम, विशाल धुमाळ यांनी तपासात सहभाग घेतला होता.
वयोवृद्ध पेन्शनधारकांनी अज्ञात फोन टाळावेत, तसेच कोणी याबाबतची माहिती मागितली असता तत्काळ त्या नंबरची माहिती सातारा शहर पोलिसांना द्यावी, असे आवाहन सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |