सातारा : वरखडवाडी, ता. वाई येथे भोंदूगिरी करून वाघजाई मंदिराच्या रस्त्यात खड्डा करून तेथे हळकुंड, हिरवी बांगडी, तंत्र मंत्र साहित्य पसरवल्या प्रकरणी उमेश फणसे याच्यावर जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरखडवाडी येथील वाघजाई मंदिराच्या लगत असणार्या करवंदाच्या जाळीत पाच फूट रुंद, सहा फूट लांब आणि पाच फूट खोल खड्डा खणण्यात आला होता. तेथे लिंबू, हळकुंड, हिरवी बांगडी असे साहित्य आढळून आले. हे प्रकरण 12 मे रोजी उघडकीस आले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोळकर यांना या प्रकरणाची कल्पना मिळाली. त्यानुसार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सत्यशोधन समितीचे सदस्य डॉ. दीपक माने, वंदना माने, प्रमोद भिसे, रणवीर गायकवाड यांनी या ठिकाणी भेट दिली. तेव्हा उपसरपंच नितीन वरखडे, पोलीस पाटील साधना जाधव, ग्रामसेवक मल्हार शेळके आणि वीस ते पंचवीस ग्रामस्थ उपस्थित होते.
संपूर्ण गावात या गोष्टीमुळे दहशत पसरली असून नरबळीसारखा प्रकार असू शकतो, अशी शंका व्यक्त करण्यात आली. गेल्या वर्षी येथून जवळच धावजी पाटील देवस्थानच्या जवळ असा प्रकार उघडकीस आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वाई पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे व पोलीस अधीक्षक समीर शेख यांना ही माहिती देण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते दीपक माने यांनी तक्रार दाखल केली, तर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत उमेश फणसे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत मुगाने करत आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |