सातारा : येथील शाहूनगर, जगतापवाडी परिसरात राहणारे सागर नामदेव पाटील (वय ४१, मूळ रा. काळम्मावाडी वसाहत कागल, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सात लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर पाटील हे जलसंपदा विभागात नोकरी करतात. साताऱ्यातील शाहूनगर परिसरात ते भाड्याने घर घेऊन राहत आहेत. दि. ११ मेरोजी ते कुटुंबासह गावी गेले होते. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता ते साताऱ्यातील घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी केली. तसेच पंचनामाही केला. चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा, कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले ७ तोळ्यांचे गंठण, ७ तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस तसेच दागिने खरेदीच्या पावत्या, असा सुमारे ७ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |