09:16pm | May 13, 2024 |
सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयांमध्ये केवळ दहा दिवस पुरेल इतकाच रक्त साठा उपलब्ध आहे. निगेटिव्ह वर्गाच्या रक्ताची प्रचंड टंचाई असून जिल्ह्यामध्ये ही टंचाई रक्तदान शिबिरे घटल्यामुळे झालेली आहे. सामाजिक संस्था तसेच शासकीय स्तरावरूनही रक्तसंकलनासाठी वाढीव प्रयत्न होणे गरजेचे आहे. रक्त साठा घटल्यामुळे थॅलेसेमिया झालेल्या रुग्णांची प्रचंड अडचण होत असून त्यांना तातडीचे रक्त उपलब्ध होणे गरजेचे बनले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा रुग्णालय कराड उपजिल्हा रुग्णालय या दोन ठिकाणी सरकारी ब्लड बँक आहेत. याशिवाय नऊ खाजगी ब्लड बँक असून वाई येथे सरकारी रक्त संकलन केंद्र उपलब्ध आहे. सातारा जिल्हा रुग्णालयांमध्ये केवळ दहा दिवस पुरेल इतकाच रक्त साठा उपलब्ध असल्यामुळे रक्ताच्या पुरवठ्याची संवेदनशीलता ऐरणीवर आली आहे. गर्भवती माता, थैलेसिमियाचे रुग्ण अथवा गंभीर जखमी झालेल्या अपघातातील रुग्ण यांना रक्ताची तातडीने गरज भासत असते. मात्र केवळ दहा दिवसाच्या रक्ताच्या साठ्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणार्या रुग्णांना उपचार कसे करावे? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन कक्षामध्ये गेल्या चार महिन्यापासून रक्तदान शिबिरांचे कोणतेही आयोजन झालेले नाही. सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही खाजगी रक्तपेढीमध्ये किमान दहा ते बारा रक्त पिशव्यांची मागणी असते. ओ पॉझिटिव्ह हा वैश्विक रक्तदाता समजला जातो. मात्र ए निगेटिव्ह आणि बी निगेटिव्ह रक्तदाते दुर्मिळ असतात. त्या रक्ताची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्त संकलन कार्यक्रमांना मर्यादा आल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेचा फटका बसून उष्माघाताचे प्रकार उद्भवतात. रक्तातील ग्लुकोज पातळी कमी झाल्यामुळे चक्कर येणे, रक्ताच्या गुठळ्या होणे असे गंभीर प्रकार उद्भवू शकतात. या कारणांमुळे उन्हाळ्यामध्ये होणारी रक्तदान शिबिरे ही एक ते दोन टक्के इतकीच असतात. रक्तदाता चळवळ वाढवण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासन विशेषतः सातारा जिल्हा रुग्णालय व सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांनी सामूहिक प्रयत्न उभे करणे गरजेचे आहे.
रक्तदाता सुदृढ 18 वर्षे पूर्ण किमान, हिमोग्लोबिन प्रमाण 10.5 इतके असणे आवश्यक आहे. रक्तदान शिबिराविषयी जनजागृती वारंवार केली जाते. मात्र तरीही सुदृढ रक्तदाते रक्तदानासाठी पुढे येत नाहीत, ही अडचण आहे. येत्या दहा दिवसात मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन झाले नाही तर सरकारी स्तरावरचा रक्त साठा अत्यंत मर्यादित होणार आहे.
यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी रक्तदात्यांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. रक्तदानाचे कोणतेही अपाय होत नाहीत. रक्तदान केल्याने रक्ताभिसरणाला आपोआप चालना मिळते. याशिवाय शासकीय पातळीवर आरोग्य विभाग सामूहिकपणे संघटित राहील. रक्तदाता माहिती संकलन विभागांमध्ये याविषयीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याविषयीचे महत्त्वाचे कार्यक्रम घेतले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |