08:16pm | May 14, 2024 |
सातारा : सातत्याने अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा जोर सुरूच आहे. सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये वळवाने मंगळवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली. सलग पाच दिवस पावसाचा हा जोर कायम आहे. आज कराड, वाई, पाटण, सातारा तालुका, शहर या भागामध्ये सुमारे अर्धा ते पाऊण तास विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला.
जिल्ह्यात यंदाचा उन्हाळा प्रचंड तापदायक ठरला. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण या तालुक्यांत नागरिकांचे उन्हाच्या तडाख्याने प्रचंड हाल झाले, तर दुष्काळाच्या झळा पाणीटंचाईमुळे अधिक तीव्र झाल्या. सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी मंगळवारी वळीवाचा जोरदार पाऊस झाला. कराडच्या कोल्हापूर नाका, भेदा चौक, विटा रस्ता तसेच कराड ग्रामीण परिसरामध्ये सुमारे अर्धा ते पाऊण तास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. वाई, पाटण, महाबळेश्वर येथे जोरदार पाऊस झाल्यामुळे तापमानाचा पारा खालावला आहे.
अरबी समुद्रामध्ये सातत्याने कमी दाबाचे पट्टे निर्माण होत असल्यामुळे वळीव सदृश्य पाऊस पडत असून त्याचा जोर येत्या काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सातारा शहरात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. दुपारी तीन वाजल्यानंतर वातावरण अंधारून आले. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामध्ये मेघगर्जनेसह जोरदार वारे सुटले. त्यानंतर 15 ते 20 मिनिटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणातील उकाडा कमी होण्यास मदत झाली.
मुसळधार पावसाने प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या परिसरात असणारे महाकाय झाड जोरदार पाऊस आणि वार्यामुळे कोसळले. सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र झाडाखाली असणारा हातगाडा आणि एक दुचाकी वाहन यांचे फांद्या कोसळून नुकसान झाले. सातारा पालिकेच्या आपत्ती निवारण विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तेथील फांद्या हटवण्यास सुरुवात केली होती.
सातारा शहरात मागील काही दिवसापासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. मंगळवारी शहराच्या पश्चिम भागामध्ये दिवसभर वीज खंडित होती. त्यामुळे महावितरण बद्दल सातारकरांच्यातून संताप व्यक्त होत आहे. सायंकाळी साडेसहा पर्यंत शहराच्या विविध भागांमध्ये विजेचा पत्ता नव्हता. त्यामुळे नागरिकांचा महावितरणच्या कामकाजाबाबत रोष खूपच वाढलेला आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |