सातारा : वर्ये, ता. सातारा येथील आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या बिलावरुन दि. 14 मे रोजी दुपारी 12.20 वाजण्याच्या रुग्णाच्या भावाने डॉक्टर दाम्पत्यास मारहाण करत रुग्णालयात तोडफोड केली. त्यावरुन रुग्णाचा भाऊ विशाल विजयकांत येवले रा. वाई याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डॉ. अनिल शिंगे वय 60 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आकाश विजयकांत येवले याला आकडीचा त्रास असल्याने त्यास घेवून त्याचा भाऊ विशाल हा हॉस्पिटलमध्ये आला होता. आकाशला डमीट करुन उपचार सुरु असताना विशाल याने आम्हाला डिस्चार्ज द्या, वाईला पुढील उपचारसाठी जायचे आहे, असे सांगताच डॉ. शिंगे यांनी थोडा वेळ थांबा, बिल सांगतो असे म्हणताच विशाल याने मी तुम्हाला एक पैसा देणार नाही. मी पेशंट घेवून जाता,े असे म्हणून डॉ. शिंगे यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. तर डॉक्टरांची पत्नी डॉ. अंजली यांनाही शिवीगाळ केली. धक्काबुक्की करत त्याने हॉस्पिटलमधील प्लास्टिकच्या खुर्च्या, टेबलची तोडफोड केली. यावरुन सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास एपीआय ताटे हे करत आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |