09:54pm | Nov 19, 2024 |
सातारा : जिल्ह्यात उद्या होवू घातलेल्या 8 विधानसभा मतदारसंघातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जिल्ह्यातील सर्वच आगारातील 449 बसेस निवडणूक केंद्रांवर मतदानयंत्रे व त्यासाठी नेमलेले कर्मचारी संबंधित मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी अधिगृहित केल्यामुळे सातारा सह जिल्ह्यातील हजारो प्रवाशांचे हाल झाले. आंतरराज्य प्रवास करणार्या लोकांचे मात्र बेहाल झाल्याने अनेकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त केली.
राज्यातील शहरासह ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली लालपरी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकार्यांनी अधिगृहित केल्यामुळे जिल्ह्यात असलेल्या 100 टक्के पैकी फक्त 10 टक्केच बसेस म्हणजेच फक्त 45 बसेस ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ मार्गस्थ करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात उद्या होत असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघातील 3 हजार 165 मतदान केंद्रांवर निवडणुकीचे साहित्य तसेच त्यासाठी नेमलेल्या कर्मचार्यांना नेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील विविध बस आगारांमधील 449 बसेसचे अधिग्रहण केले होते.
आज सकाळीच सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्वच बस आगारांमधील बसेस मतदान साहित्य व मतदान केंद्रावर नेमलेल्या अधिकारी-कर्मचार्यांना घेवून मार्गस्थ झाल्याने सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांमध्ये प्रवासी होते, मात्र बसेसचा शुकशुकाट होता. नेहमीप्रमाणे प्रवासासाठी जाणारे तसेच मतदानासाठी जाणार्या चाकरमान्यांची बसेस अभावी मोठी गैरसोय झाली. यावेळी अनेकांनी खाजगी वाहतूक करणार्या वाहनांचा आधार घेतला. मात्र, खाजगी वाहतूक करणारी वाहनेही अल्प असल्याने त्यांनीही ऐनवेळी प्रवासभाडे वाढवल्याने अनेकांची पंचाईत झाली. आंतरराज्य प्रवास करणार्या प्रवाशांची मात्र अक्षरश: पाचावर धारण बसली होती. वृद्ध, नोकरदार महिला, पुरुष तसेच लहान मुलांनाही बससेवा कोलमडल्यामुळे नाहक त्रास सोसावा लागला.
जिल्ह्यात दर पाच वर्षांनंतर लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असतात. यावेळी मोठ्या प्रमाणावर निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून एसटी बसेसचे अधिग्रहण केले जाते. मतदाना दिवशी पूर्ण दिवस बससेवा कोलमडलेली असते. याचा नाहक फटका प्रवास करणार्या लोकांना बसत असतो. हा अनुभव गाठीशी असूनही राज्य परिवहन मंडळाला मात्र याचे काही एक सोयरसुतक नसते. अनेकांना नेमके याच दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी परगावी जावे लागते. परंतू, बससेवाच उपलब्ध नसल्याने अशा हजारो लोकांना मतदान करण्यापासून वंचित रहावे लागते. निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान मतदानाचा हक्क लोकांनी बजवावा, यासाठी आग्रही असते. याची जाहिरातही कोट्यवधी रुपये खर्च करुन केली जाते. मात्र, मतदान बजावण्यासाठी लोकांनी नक्की कशाने प्रवास करावा? याचे उत्तर मात्र निवडणूक आयोगाकडे नसते. पुढच्या निवडणुकीवेळी निवडणूक आयोग तसेच निवडणूक निर्णय अधिकार्यांनी बसेसचे अधिग्रहण करण्यापूर्वी मतदानादिवशी प्रवास करणार्या लोकांच्या प्रवासासाठी इतर वाहनांची सोय करावी, अशा संतापजनक प्रतिक्रियाही सातारा बसस्थानकातून परगावी प्रवास करणार्या प्रवाशांनी ‘सातारा टुडे’शी बोलताना दिल्या.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |