मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात!

विद्यार्थिनी रमल्या मतदान जागृतीमध्ये!

by Team Satara Today | published on : 18 November 2024


कोरेगाव : येथील कन्या माध्यमिक विद्यालयामध्ये" मतदान आणि निवडणूक" या विषयावर आधारित विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थिनींना प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपात देण्यात आली. त्यांनी ती आनंदाने सोडविल्या.कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध प्रकारे मतदान जागृती करण्यात येत आहे. त्या अंतर्गत इतिहास, भूगोल, निवडणूक ,मतदान, मराठी व्याकरण इत्यादी विविध विषयावर आधारित अभिनव प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या.

घोषवाक्य, रांगोळी, काव्यवाचन...

विद्यार्थिनी रमल्या मतदान जागृतीमध्ये!

वक्तृत्व, चित्रकला, घोषवाक्य, काव्यवाचन, होर्डिंग, रांगोळ्या अशा विविध कला माध्यमांचा आविष्कार घडवत येथील कन्या माध्यमिक विद्यालयाच्या शेकडो विद्यार्थिनींनी मतदान जागृतीचा जणू उत्सव भरविला! लोकशाहीचा उत्सव असलेल्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. त्या अंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध प्रकारे मतदान जागृती करण्यात येत आहे. विद्यार्थिनींनी वक्तृत्व, होर्डिंग, चित्रकला, घोषवाक्य अशा विविध माध्यमातून मतदान जागृती करण्यासाठी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. देशप्रेम आणि त्या अनुषंगाने  घोषवाक्ये लिहिली. होर्डिंग रेखाटली.

मुख्याध्यापक शहाजी देशमुख यांनी प्रशासनाच्या आवाहनानुसार संपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शन केले. इतर शिक्षकांनी याबाबत विशेष मेहनत घेतली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजीत नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे, जनजागृती विभागाचे प्रमुख नोडल ऑफिसर धनंजय चोपडे, पथकप्रमुख यशेंद्र क्षीरसागर, सदस्य मंगेश घाडगे इतर कर्मचाऱ्यांनी विविध उपक्रमाद्वारे मतदान जागृतीची मोहीम हाती घेतली आहे. शाळांना याबाबत विशेष आवाहन करण्यात आले.  शिक्षक बी.एस. वायळ यांनी या प्रश्नमंजुषा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. कन्या माध्यमिक विद्यालयाने नुकतेच "मतदान साहित्य संमेलन" भरवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आणि वेगळ्या उपक्रमाची दिशा दाखवली आहे. तसेच रांगोळी चित्रकला घोषवाक्य इत्यादी उपक्रम राबवून मतदान जनजागृतीत भरीव योगदान देत आहे. सर्व उपक्रमांबद्दल प्रशासनाने कन्या माध्यमिक विद्यालयाचे कौतुक केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजलेल्या चण्यांचे करा सेवन
पुढील बातमी
दिल्लीत प्रदूषणाचा कहर

संबंधित बातम्या