03:33pm | Nov 20, 2024 |
दिल्ली : दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय घेतला आहे. ५० टक्के कर्मचारी हे आता त्यामुळे घरून काम करतील असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठकही बोलावली आहे.
बुधवारी पर्यावरण मंत्री गोपाल राय दिल्ली सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतींबाबत संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. बैठकीत वर्क फ्रॉम होम करण्याच्या पद्धती ठरवल्या जातील. जेणेकरून सरकारी कामात अडथळा येणार नाही.
गेल्या काही दिवसांत दिल्ली एनसीआरमध्ये वायू प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरावर पोहोचली आहे. जोरदार वाऱ्यांमुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक कमी झाला असला तरी, AQI अजूनही अत्यंत गंभीर श्रेणीत आहे.
बुधवारी सकाळी ६.४५ वाजता देखील दिल्लीत AQI अत्यंत खराब म्हणून नोंदवण्यात आला. द्वारका आणि उत्तम नगरमध्ये सर्वाधिक 388 AQI नोंदवला गेला. याशिवाय जनकपुरीमध्ये ३८४, सुखदेव विहारमध्ये ३८१, अलीपूरमध्ये ३७९, शालीमार बागेत ३७७, रोहिणीमध्ये ३८२, मॉडेल टाऊनमध्ये ३७७ ची नोंद झाली आहे. आजही दिल्लीतील बहुतांश भागात AQI ३०० पेक्षा जास्त आहे.
दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी मंगळवारी केंद्र सरकारला प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेजारील राज्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक बोलावण्याचं आवाहन केलं होतं. दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दिल्ली सरकारने वारंवार केलेल्या विनंतीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही ते म्हणाले होते.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |