अमेरिका : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान संभाव्य हवाई हल्ल्याच्या धोका लक्षात घेऊन अमेरिकेने कीव्ह (Kyiv) येथील दुतावास बंद केले आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह येथील अमेरिकेच्या दूतावासाला बुधवारी संभाव्य हवाई हल्ल्याबाबत माहिती मिळाली. यामुळे दुतावास बंद केले जाईल, असे अमेरिकेच्या स्टेट कॉन्सुलर अफेयर्स विभागाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
"हवाई हल्ल्याचा अलर्ट जारी केल्यास अमेरिकन नागरिकांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी जावे," असे अमेरिकेच्या दुतावासाने म्हटले आहे. युक्रेनने पश्चिमेकडील ब्रायन्स्क प्रदेशात अमेरिका निर्मित लांब पल्ल्याची ATACMS ६ क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा रशियाने मंगळवारी केला होता. युक्रेन- रशिया युद्धाला १ हजार दिवस पूर्ण झाले आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारने युक्रेनला रशियावर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कीव्हमधील दुतावासाच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेतली आहे.
रशियाने पश्चिमी देशांना इशारा दिला आहे की जर अमेरिकेने युक्रेनला अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स निर्मित क्षेपणास्त्रे रशियामध्ये डागण्याची परवानगी दिली तर रशिया नाटो देशांच्या सदस्यांना युक्रेनमधील युद्धात थेट सहभागी होण्याचा विचार करेल.
रशियावर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ला झाल्यास रशिया प्रत्युत्तरात अण्वस्त्रांचा वापर करू शकतो, अशी तरतूद रशियाच्या नव्या अण्वस्त्र धोरणात आहे. यामुळे युद्ध भडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |