03:03pm | Nov 20, 2024 |
सातारा : आज होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई, ठाणे तसेच पुणे येथे चाकरमानी असलेल्या जिल्ह्यातील भूमीपुत्रांनी मतदानासाठी आपापल्या गावांकडे धाव घेतल्याने काल रात्रीपासूनच मुंबईपासून पुण्यापर्यंत असलेल्या दृतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. पुणे ते सातारा दरम्यान महामार्गावरही वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभा निवडणुकांचा गेल्या महिन्यामध्ये बिगुल वाजला. 288 जागांसाठी 5 हजार 347 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. सातारा जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल 198 जणांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. पैकी खरा सामना राष्ट्रीय मान्यता असलेल्या पक्षांमध्येच म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्येच आहे.
2019 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेले उमेदवारच मुख्यत्वे याहीवेळी उभे आहेत. परंतू गेल्या अडीच वर्षांपूर्वी राजकीय समीकरणे बदलली. युत्या-आघाड्या तुटल्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला. सध्याची निवडणूक विद्यमान आमदारांसाठी सोपी नसल्याने सहा महिन्यांपूर्वीच विद्यमानांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती.
सातारा जिल्ह्यातील पाटण, जावली, माण-खटाव, महाबळेश्वर तसेच फलटण-खंडाळा तालुक्यातील अनेक भूमीपुत्र नोकरीच्या निमित्ताने मुंबई, नवी मुंबई, पुणे याठिकाणी स्थायिक आहेत. त्यांची संख्याही लाखोंमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर या तालुक्यांतील पुढार्यांनी काही वर्षांपूर्वीच या चाकरमान्यांचे मतदान आपापल्या गावांच्या मतदान याद्यांमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांचा टक्काही लक्षणीय वाढला.
2024 च्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर जिल्ह्यात प्रचाराच्या तोफा धडाडत असताना याच तोफा मुंबई, ठाणे, पुणे येथील भूमीपुत्रांच्या मेळाव्यातही धडाडल्या. मतदानासाठी गावाकडे चला, अशी भावनिक साद यावेळी घालण्यात आली. मन वळविण्यासाठी प्रसंगी साम-दाम-दंड-भेद या नीतीचाही वापर करण्यात आला. शेवटी उमेदवारांचे प्रयत्न फळास आले. काल दि. 19 रोजी सातारा जिल्ह्यातून तसेच मुंबई, ठाणे, पुणे येथील खाजगी वाहने आरक्षित करण्यात आली. त्याद्वारे पती-पत्नी या मतदारांसह त्यांच्या चिल्ल्या-पिल्ल्यांनी खाजगी वाहने भरुन सातारच्या दिशेने मार्गस्थ झाली.
सातारा जिल्ह्याबरोबरच पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली तसेच कोकणातील भूमीपुत्र मतदारही एकाचवेळी मुंबईतून बाहेर पडल्याने कळंबोली ते लोणावळा-खंडाळा दरम्यान असलेल्या भोर घाटामध्ये अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी निर्माण झाली. चार-पाच तास वाहने एकाच ठिकाणी उभी राहिल्याने वृद्ध तसेच लहान बालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पुणे-सातारा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झाली होती. आज सकाळपर्यंत ही कोंडी फुटली नसल्याने अनेक मतदारांना वेळेत मतदान करण्यासाठी आपल्या गावांपर्यंत पोहोचणे जिकिरीचे झाले होते. आज दुपारपर्यंत बर्यापैकी वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आल्याने महामार्गानेच अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला.
हक्कांच्या मतदारांसाठी उमेदवारांची फोनाफोनी!
विधानसभा निवडणूक जिंकायचीच, या इराद्याने निवडणुकीच्या आखाड्यात उभे राहिलेल्या उमेदवारांनी गेल्या महिनाभरात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवत समोरच्या उमेदवाराला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. परंतू आरोप-प्रत्यारोपांबरोबरच निवडणुकीत आपले पारडे जड कसे राहील, याचीही पुरेपूर काळजी घेतली. बेरजेच्या राजकारणात माहीर असलेल्या मातब्बरांनी थेट मुंबई-पुण्यात हात घालत भूमीपुत्रांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले. कालच त्यांना गावाकडे आणण्यासाठी खाजगी वाहने पाठविण्यात आली. परंतू ही वाहने सकाळपर्यंत कोंडीत अडकल्यामुळे उमेदवारांचा रक्तदाब वाढलेला होता. अनेक उमेदवारांनी त्यांना आणण्यासाठी पाठविण्यात आलेल्या म्होरक्यांना फोन केले. मात्र, गेली चार-पाच तास गाड्या एकाच ठिकाणी थांबल्यामुळे त्यांना काय एअरलिफ्ट करायचे काय, असा त्रागा म्होरक्यांनी व्यक्त केला. शेवटी उमेदवारांनी थेट त्या-त्या ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलीस अधिकार्यांना फोनाफोनी करुन काहीही करा, पण आमच्या मतदारांना गावापर्यंत टायमात पोहोचवा, अशी कळकळीची विनंती केली.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |