जीवनसत्त्व ‘क’चे आहारातील महत्त्व

आहारात ‘क’ जीवनसत्त्वाचा करा समावेश

by Team Satara Today | published on : 20 November 2024


ज्या लोकांमध्ये ‘क’ जीवनसत्त्वाची कमतरता असते, त्यांची हाडे ठिसूळ होतात व कातडीही सैल होते. शिवाय क जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे, दाढ हलणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे आपल्या आहारात ‘क’ जीवनसत्त्वाचा समावेश करावा. फळे, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, भोंगी मिरची, रसाळ व कडवट फळे इत्यादींमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.

क जीवनसत्त्व हे शरीरातील मूलभूत रासायनिक क्रियांमध्ये समतोल निर्माण करून शरीरातील क्रिया प्रमाणित करण्यास मदत करते. संवाहकांकरवी संदेश पाठवणे, पेशींपर्यंत ऊर्जा पोहोचविणे इत्यादी शरीरातील अनेक महत्त्वाच्या रासायनिक क्रियांचे नियंत्रण क जीवनसत्त्व करते. व्हिटॅमिन सीमुळे सांध्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. सोबत शारीरिक जखमादेखील जलद गतीने ठीक होतात. याव्यतिरिक्त अन्य शारीरिक कार्यप्रणाली सुरळीत सुरू राहण्यासाठीही व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. क जीवनसत्त्वामधील अँटिऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिक्ल्सशी लढते. फ्री रॅडिकल्समुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या पडतात आणि शरीराचे अवयव लवकर बाधित होऊ लागतात. त्यामुळे आपल्या आहारात क जीवनसत्त्व असलेल्या फळांचा समावेश जरूर करावा.

काही लोकांच्या मते, क जीवनसत्त्वामुळे सर्दी पडसे कमी न होता वाढते; पण संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे की, क जीवनसत्त्व सर्दीवरही गुणकारी आहे. आपल्याला आठवत असेल, तर कोरोना काळात दिल्या जाणार्‍या औषधांमध्ये सी व्हिटॅमिनच्या गोळीचा समावेश होता. प्रत्येक पेशीचा व्यवस्थित विकास होण्यासाठी क जीवनसत्त्व अत्यंत आवश्यक घटक आहे. ज्या लोकांमध्ये क जीवनसत्त्वाची कमतरता असते, त्यांची हाडे ठिसूळ होतात व कातडीही सैल होते. शिवाय क जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे, दाढ हलणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे आपल्या आहारात क जीवनसत्त्वाचा समावेश करावा. फळे, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, भोंगी मिरची, रसाळ व कडवट फळे इत्यादींमध्ये क जीवनसत्त्व असते. तज्ज्ञांच्या मते, दररोज 60 मिलिग्रॅम क जीवनसत्त्व शरीरात जायलाच हवे.

क जीवनसत्त्वामुळे आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते व आपला मूड चांगला बनण्यास मदत होते. सेरोटोनीन या मेंदूत स्रवणार्‍या द्रव्याच्या उत्पत्तीसाठी क जीवनसत्त्वाची खूप मदत होते. हे द्रव्य झोप येणे व सकारात्मक विचार उत्पन्न करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. क जीवनसत्त्वाला ‘स्ट्रेस व्हिटॅमिन’ असेही म्हणतात; कारण तणावाच्या अवस्थेत क जीवनसत्त्वाचे सेवन केल्यास मनःस्थिती स्थिर राहण्यास मदत होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अमेरिकेने कीव्ह येथील दुतावास केले बंद
पुढील बातमी
रेल्वेच्या जनरल बोगींची संख्या वाढणार

संबंधित बातम्या