05:16pm | Nov 20, 2024 |
नवी दिल्ली : भारतीय संघाचे या वर्षीचे टी20 क्रिकेटचे सर्व सामने सामने संपले आहेत. भारताने यंदा जबरदस्त कामगिरी केली आहे. 26 टी20 सामन्यापैकी 24 सामन्यात विजय मिळवला आहे. तर झिम्बाब्वे आणि दक्षिण अफ्रिकेने प्रत्येकी एका सामन्यात पराभूत केलं आहे. असं असताना या टी20 स्पर्धेच्या शेवटच्या काही सामन्यात संजू सॅमसनला सूर गवसला आहे. मागच्या पाच डावात संजू सॅमसनने तीन शतकं ठोकली आहेत. त्यामुळे संजू सॅमसन जबरदस्त फॉर्मात असल्याचं अधोरेखित होतं. असं असताना संजू सॅमसनवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. सैयद मुश्ताक अली स्पर्धेसाठी संजू सॅमसनकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. केरळ संघाने संजू सॅमसनला कर्णधारपद सोपवलं आहे. भारतीय संघ जानेवारीपर्यंत एकही टी20 सामना खेळणार नाही. त्यात सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान होणार आहे.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून कसोटी संघात संजूची निवड झालेली नाही. त्यामुळे संजू सॅमसन सैयद मुश्ताक अली स्पर्धेसाठी उपलब्ध आहे. नुकत्याच खेळलेल्या रणजी स्पर्धेत संजू सॅमसन केरळकडून सचिन बेबीच्या नेतृत्त्वात खेळला होता. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यात काही खास करू शकला नाही. पण शेवटच्या सामन्यात शतक ठोकत आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर दक्षिण अफ्रिका दौऱ्यात 4 पैकी दोन सामन्यात शतकी खेळी केली.
सैयद मुश्ताक अली स्पर्धा 23 नोव्हेंबरपासून आहे. या स्पर्धेतील केरळचा पहिला सामना हैदरामध्ये सर्व्हिसेज विरुद्ध होणार आहे. केरळचा संघ ग्रुप ई मध्ये आहे. या ग्रुपमध्ये गोवा, मुंबई, महाराष्ट्र, सर्व्हिसेज, नागालँड आणि आंध्र प्रदेश यांच्याशी सामना होणार आहे. केरळ संघाचे सर्व सामना जिमखाना ग्राउंड आणि राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहेत.
सैयद मुश्ताक अली स्पर्धेसाठी केरळचा संघ: संजू सॅमसन (कर्णार), सचिन बेबी, रोहन कुन्नुमल, जलज सक्सेना, विष्णु विनोद, मोहम्मद अज़हरुद्दीन, बासिल थम्पी, एस निजार, अब्दुल बासिथ, ए स्कारिया, अजनास ईएम, सिजोमन जोसेफ, मिधुन एस, वैसाख चंद्रन, विनोद कुमार सीवी, बासिल एनपी, शराफुद्दीन एनएम, निधिश एमडी.
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |

एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |