12:47pm | Nov 19, 2024 |
सातारा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सातारा शंभर टक्के मतदान उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद जिल्हा कक्षाने जोरदार जनजागृती मोहीम राबवून जिल्ह्यातील एक लाख पंच्याहत्तर कुटुंबांना प्रत्यक्ष गृहभेट देऊन २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण कुटुंबाने मतदान करावे असे आवाहन केले असल्याची माहिती स्विप कक्षाच्या नोडल अधिकारी तथा सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.
स्विप कक्षाच्या नोडल अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनानुसार गुगल मीटच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उमेद अंतर्गत ग्रामीण भागात कार्यरत 2 हजार प्रेरिकांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधत मतदार जनजागृतीबाबत प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी मार्गदर्शन केले होते. यातून आणि मतदान शंभर टक्के होण्यासाठी कशा पद्धतीने कार्यवाही केली जावी याबाबत सविस्तर माहिती दिली होती. या बैठकीत उमेद अभियानात कार्यरत प्रेरीकांनी गावोगावी प्रत्यक्ष गृह भेट घेऊन मतदारांना मतदान करणे विषयी समुपदेशन करणे बाबत अवाहन केले होते.
याला प्रतिसाद देत जिल्हा अभियान सहसंचालक विश्वास सिद व जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील 2 हजार प्रेरिकांनी दि. १५ ते १७ नोव्हेंबर रोजी अभियानांतर्गत स्थापित बचत गट, ग्रामसंघ व प्रभागसंघ यांच्या बैठकांचे आयोजन करून त्यामध्ये १०० % मतदारांनी मतदान करणेबाबत समुपदेशन केले. या समुदाय स्तरीय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मतदार जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्यात आले. या संपूर्ण उमेद समूहाच्या जाळ्यातून जिल्ह्यातील एक लाख पंच्याहत्तर हजार कुटुंबाना प्रत्यक्ष गृह भेट देऊन समुपदेशन करण्यात आले. यावेळी संबंधित कुटुंबातील कुटुंब प्रमुखांनी आम्ही मतदान प्रक्रियेत शंभर टक्के सहभागी होऊ, अशी ग्वाही दिली आहे.
सदर मोहीम यशस्वी होणेसाठी जिल्हा व्यवस्थापक मनोजकुमार राजे, स्वाती मोरे, संजय निकम तसेच उमेद अभियानात कार्यरत सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांनी मेहनत घेतली.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |