04:46pm | Nov 19, 2024 |
सातारा : गेट टुगेदर म्हटलं की, हायस्कूल, कॉलेज येथील बॅचचा, ही संकल्पना. पण या सर्व बाबींपेक्षा ज्या शाळेत शैक्षणिक पाया रचला तिथे गेट टुगेदर होणे नशिबावानच मित्र म्हटले जात आहेत. झेडपीच्या शाळेतील इयत्ता चौथी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्वाचा टप्पा. यानंतर प्रत्येकाने आपआपल्या योग्यतेनुसार,आवडीनुसार करिअरच्या मार्गाची निवड करतानाच हायस्कूलची निवड करुन आज विविध क्षेत्रात करीअर करत आहेत. आज याला २९ वर्षे झाली. अर्थातच हे वर्षे म्हणजे आपली आदर्की बुद्रुक ता. फलटण येथील जिल्हा परिषद शाळेची १९९५/९६ ची बॅच. या दरम्यान करिअरच्या मागे धावत असताना आपल्या मित्रांना भेटणं तर दूरच पण बोलणंही तसं नव्हतच. पण व्हाट्सएप अन फेसबुकने आपल्या सर्वांच्या मैत्रीचा जणू पुनर्जन्मच घडवून आणला आहे.
झेडपीच्या शाळेत गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर त्यावेळी जसे सर्व मिळून वर्ग खोल्यांची स्वच्छता करत असत. रांगोळी काढली जात असत. प्रार्थना म्हटली जात असत या सर्व बाबी त्यावेळचे वर्गशिक्षक शेख गुरुजी यांच्यासवमेत झाली अन सरकन अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. दरम्यान, या शाळेला एक सुखद आठवण म्हणून सर्वांच्या सहमतीने पाच सिमेंटचे बेंच या शाळेला देण्याचे ठरले आहे. ते लवकरच सुपूर्द करण्यात येणार आहेत.
भूतकाळात रमण हा मनुष्याचा स्थायी भाव आहे. पण यामध्ये किती रमल जावं, याचे ही बंधन आखायलाच हवे. अन्यथा आठवणीवर जगायची आपणांस सवय लागत असते. आपण वर्तमानात जगायची सवय लावून घेतली पाहिजे. आज केलेलं चांगलं काम भविष्यात भूतकाळाच्या आठवणी बनून समोर येत असते. अगदी आजच्या फेसबुकवरील मेमरीसारखं. म्हणून आपल लक्ष आज वर केंद्रित असलं पाहिजे.
आपल्या सर्वांना आठवतंय का पहा, मराठी शाळेनंतर हायस्कूलला गेल्यावर तिथे हिंदीमध्ये भूतकाळाला अन भविष्यकाळाला कल असे म्हटले होते. एक 'कल' म्हणजे काल चा गेट टू गेदर तर दुसरा कल म्हणजे उद्या हे तस पाहिलं तर दोन्ही आपल्या हातात नाहीत. म्हणूनच आपला 'कल' म्हणजे प्रभाव आज वरच असला पाहिजे. हे लक्षात घेऊन कल हो न हो हे गाणे ऐकलं तर आपल्याला दोन्ही 'कल' चा 'कल' कोणत्या दिशेने आहे, हे लक्षात आल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आजचा विचार करायला हवं.
कार्यक्रमाचे संयोजन १९९५/९६ च्या सर्व भावांनी केले होते. यामध्ये काहींचे मनोगते ह्रदयाला साद घालणारी होती. हे संयोजन पाहून सासरी गेलेल्या सर्व भगिनींना आता पुन्हा माहेरवासीयाच्या या पुढील गेट टुगेदरची मात्र तितकीच उत्सुकता लागली आहे.
गावच्या यात्रेदरम्यान होणार दुसरा गेट टुगेदर
कालच्या गेट टू गेदरच्या कार्यक्रमात सर्वांनी आपली ओळख सांगितल्यानंतर काहींनी त्यावेळच्या शाळेतील काही सुखद आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी सुधीर मोघे यांची एक कविता आठवली...भले बुरे जे घडुनी गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर...! असं म्हणत आदर्की बुद्रुक येथील १९९५/९६ च्या इयत्ता चौथीच्या बॅचचा गेट टुगेदर झेडपीच्या शाळेत त्यावेळच्या आठवणींना उजाळा देत उत्साहात झाला. आता पुढील गेट टूगेदर हा गावच्या यात्रेच्या दरम्यान घेवूया यावर सर्वांनीच सहमती दर्शवली.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |