10:34pm | Apr 29, 2024 |
सातारा : समाज माध्यमाच्या द्वारे विरोधकांच्या वतीने देशांमध्ये मोठे षडयंत्र घडवले जाणार असल्याची भीती आहे. विरोधक समाजात खोटे व्हिडिओच्या माध्यमातून बनावटी आवाज तयार करून भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अशा खोट्या माहितीवर लोकांनी विश्वास ठेवू नये. तात्काळ त्याची माहिती पोलिसांना द्यावी. अशा षडयंत्राच्या माध्यमातून लोकांचा दिशाभूल केली जाण्याची शक्यता आहे, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. संविधान बदल हा आजचा ब्लेम गेम कॉंग्रेसकडून केला जात असल्याचा घणाघाती हल्लाबोलही यावेळी मोदी यांनी केला.
सातार्यातील कराड येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ विजयाची संकल्प सभा मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा जिल्ह्यातील तरुण सातार्यातच काम करेल, असे इंडस्ट्रियल हब येथेच बनवले जाईल. याशिवाय बुद्ध सर्किटच्या धर्तीवर स्वराज्याच्या सर्व राजधान्या युनेस्कोच्या यादीत कशा जातील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मतदारांना दिले.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे. या तंत्रज्ञानाचा मी सुद्धा समर्थक आहे. मात्र तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या कामासाठी करायला हवा सोशल मीडियाचा उपयोग मी समाजाच्या प्रगतीसाठी करत असतो. तुमच्यापर्यंत पोहोचून तुमच्या गरजा जाणून घेतो, त्यातून योजनांची माहिती देतो. मात्र विरोधक समाजात वितुष्ट निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
विरोधकांकडून फेक व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. त्या व्हिडिओत माझा केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जीपी नड्डा यांचा आवाज असतो. ते व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता च्या जोरावर तयार केले जातात. आमच्या तोंडात नको ती विधाने टाकली जातात. त्यांना माहिती आहे की शांततापूर्ण निवडणूक होत आहे, तोपर्यंत त्यांची डाळ शिजणार नाही. त्यामुळे येत्या महिन्याभरात काही ना काहीतरी मोठे षडयंत्र शिजले जाईल, नको त्या घटना घडवल्या जातील आणि त्या माध्यमातून विरोधक आपले इरादे पूर्ण करण्याचे प्रयत्न करतील, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
विरोधकांचे समाजात दुही निर्माण करण्याचे इरादे मोडून काढण्यासाठी लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच असे फेक व्हिडिओ तुमच्याकडे आले तर त्याची कल्पना पोलिसांना द्या. अशा फेक व्हिडिओच्या यंत्रणेवर निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांनी भाषण सुरू करण्यापूर्वी जय शिवराय, जय संभाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज की जय अशी घोषणा दिली. तसेच कृष्णाच्या काठावर असणार्या तमाम सातारकरांना माझा नमस्कार, असा चक्क मराठीतून श्रोत्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनाला सभेतील उपस्थित आणि टाळ्या वाजवून भरभरून प्रतिसाद दिला. तुमच्या कल्याणासाठी अहोरात्र सक्रिय राहणार आहे. कॉंग्रेस देशामध्ये संविधान बदलाची ब्लेम गेम करत असून त्या माध्यमातून वेगळे षडयंत्र राबवली जाण्याची भीती आहे. मात्र लोकांच्या कल्याणासाठी देशांमध्ये वेगवेगळ्या विकास योजना लागू करून लोकांच्या हिताचा मी विचार करत आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत संविधान बदलाचे हे षड्यंत्र कधीही मी यशस्वी होऊ देणार नाही. त्यामुळे येत्या सात मे रोजी सातारकर मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान केंद्रावर जाऊन कमळाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
पेन्शनर वयोवृद्धाला ठकवणार्या भामट्याला सातारा पोलिसांकडून अटक |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |