12:46pm | May 02, 2024 |
सातारा : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. मतदानाचा दिवशी प्रत्येक कुटुंबातील पात्र नागरिक मतदान करतील यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन 50 ते 60 कुटुंबाच्या मागे शासकीय प्रतिनिधी नियुक्त करावा. या प्रतिनिधींनी मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी जबाबदारी दिलेल्या प्रत्येक कुटुंबाला भेट देवून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात लोकसभा निवडणूक तयारी विषयी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, यांच्यासह सर्व सहायक निवडणूक अधिकारी यांच्यासह नोडल अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्व जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात आले आहे तथापी यापुढे जावून या टप्प्यात वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहेत असे सांगून डुडी म्हणाले, ग्रामीण भागात लोकांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तयार करावे या पथकात ग्रामीण भागात काम करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश असावा तसेच शहरी भागात नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभग राहील. ही पथके मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशी सकाळी 7, दुपारी 12 ते 1 व सायं. 4 वाजता घरोघरी जावून प्रत्येक कुटुंबाला भेट देतील व पात्र नागरिकांनी मतदान करावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करतील.
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
पेन्शनर वयोवृद्धाला ठकवणार्या भामट्याला सातारा पोलिसांकडून अटक |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |