उन्हाळा सुरू होताच, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनेक बदल घडतात. बऱ्याचदा खाल्लेलं अन्न लवकर पचत नाही. किंवा पचनशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे पोटाचे विकार, उलट्या, मळमळ, खाल्लेलं वेळेवर न पचने, यासह इतर समस्या निर्माण होतात. उन्हाळ्याच्या दिवसात आपण बर्फाळ आणि मसालेदार पदार्थ अधिक प्रमाणात खातो. थकवा, उष्माघात, शरीरात पाण्याचे प्रमाण वाढणे, यासह इतर समस्यांमुळे पचनसंस्थेच्या विविध समस्या उद्भवू शकतात किंवा पाण्याच्या खराब गुणवत्तेमुळेही पचनसंस्थेचे आरोग्य बिघडते.
या दिवसात पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी साधा आणि हलका आहार घ्यावा उन्हाळ्यात पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी काय करावे? यासाठी स्वामी योगगुरु रामदेव बाबा यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा
1) सकाळी रिकाम्या पोटी ग्लासभर कोमट पाणी प्या.
2) बाहेरचे पदार्थ शक्यतो खाणं टाळा.
3) पाणी नेहमी कोमट करून प्या. थंड फ्रिजमधले पाणी पिणे टाळा.
4) रात्री झोपण्याच्या २ तास आधी डिनर करा. शिवाय हलका आहार घ्या.
पोटाचे विकार दूर करण्यासाठी उपाय :
a) बऱ्याचदा खाल्लेलं अन्न नीट पचत नाही. ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅसेस, पोट फुगणे, यासह इतर पोटाचे इतर विकार छळतात. यावर उपाय म्हणून काही फळांचे आहारात समावेश करू शकता.
b) जसे की, पपई, सफरचंद, डाळिंब, नाशपाती, पेरू, संत्री यासह इतर पाणीदार फळे खाऊ शकता.
c) जर आपल्याला पोटाच्या विकारांचा त्रास असेल तर, जेवल्यानंतर नियमित बडीशेप खा.
d) सकाळी जर आपले पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर, उकळत्या पाण्यात प्रत्येकी चमचाभर जिरे, धणे आणि बडीशेप उकळवून, नंतर कोमट करून पाणी प्या.
e) जेवल्यानंतर भाजलेले आले खा.
अॅसिडिटीवर घरगुती उपाय :
1) जर जेवल्यानंतर वारंवार आंबट ढेकर येत असतील तर, दुधीभोपळा आणि तुळशीचा रस प्या.
2) बेलाच्या पानांचा ज्यूस प्या.
3) मोड आलेले मेथी दाणे खा. यामुळे पोटाचे विकार, केसांचे आरोग्य आणि वजन कमी करण्यास मदत होईल.
4) जर आपल्याला अॅसिडिटीचा वारंवार त्रास होत असेल तर, उकळत्या पाण्यात मेथी दाणे घालून त्याचा चहा तयार करून प्या.
5) जेवण नेहमी अधिक वेळ चावून खावे.
आतडे मजबूत करण्यासाठी उपाय :
a) निरोगी आतडे राखण्यासाठी आपण आहारात पालेभाज्यांचा समावेश करू शकता. त्यात फायबरसह खनिजे आणि पोषकघटक आढळतात.
b) यासह आपण रोज एक पेस्ट खाऊ शकता. यासाठी मिक्सरच्या भांड्यात गुलाबाची पाने, बडीशेप, वेलची आणि मध घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट दररोज एक चमचा खा.
खराब पचनसंस्थेवर उपाय :
1) जर खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नसेल तर, नियमित एक आयुर्वेदिक पेय प्या.
2) यासाठी ग्लासभर पाण्यात चमचाभर जिरे, धणे, बडीशेप, मेथी दाणे, ओवा घालून मिक्स करा, व पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.
3)सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी नियमित प्या. आपण हे पाणी नियमित ११ दिवस पिऊ शकता. यामुळे पचनसंस्था मजबूत होईल.
शरीर हायड्रेट आणि निरोगी राखण्यासाठी प्या 'या' फळांचा रस
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |