सातारा : एकास धमकी देवून खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ‘तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज करुन तुझे हॉटेल सील करेन,’ अशी धमकी देवून 3 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, भितीपोटी रोख 10 हजार रुपये दिले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
रोहन अरुण राजेशिर्के, संदीप शिंदे, मोरे (पूर्ण नाव, वय, पत्ते माहित नाहीत) यांच्या विरुध्द सचिन महादेव कासुर्डे (वय 43, रा. शाहूनगर, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ही घटना दि. 2 मे रोजी घडली आहे. तक्रारदार सचिन कासुर्डे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे आरटीओ चौक परिसरात हॉटेल आहे. संशयित तिघांनी आपआपसात संगनमत करुन खंडणीची मागणी केली. ’तहसीलदार यांच्याकडे तुझ्या हॉटेलची तक्रार कडून सील करेन. तक्रार नको असेल तर 3 लाख रुपये द्यायचे,’ असे म्हणून धमकी दिली. यामुळे कासुर्डे यांनी भितीपोटी 10 हजार रुपये रोख त्यांना दिले. उर्वरीत रक्कम 7 तारखेपर्यंत द्यायचे. अन्यथा गोळी घालून मारण्याची धमकीही दिली. यामुळे तक्रारदार सातारा शहर पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली.
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |