सातारा : भाजपचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवार पेठ येथील अनंत इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भाजपच्या नेत्यांमध्ये सर्वप्रथम मतदानाचा अधिकार बजावणारे उदयनराजे भोसले पहिले ठरले.
जलमंदिर या निवासस्थानावरून बाहेर पडताना त्यांनी त्यांचे वडील स्वर्गीय प्रतापसिंह उर्फ दादासाहेब महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन नमस्कार केला व तेथून जलमंदिरच्या दर्शनी भागात येऊन त्यांनी काही काळ गाणी ऐकण्याचा आनंद लुटला. त्यानंतर प्रसार माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली.
उदयनराजे म्हणाले, लोकशाहीच्या या उत्सवामध्ये मतदार राजा समाधानी असणे गरजेचे आहे. घटनेने नागरिकांना मतदानाचा हक्क दिलेला आहे. तो त्यांनी 100% वापरावा आणि लोकशाहीतील उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मतदानाला जाण्यापूर्वी उदयनराजे यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी त्यांना ओवाळून त्यांचे औक्षण केले. त्यानंतर उदयनराजे आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह बाहेर पडले आणि अनंत इंग्लिश स्कूल येथे मतदान केंद्रावर दाखल झाले. तेथे त्यांनी बोटाला शाई लावून घेतल्यानंतर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावरील सर्व अधिकार्यांना त्यांनी नमस्कार केला. तेथील कर्मचार्यांच्या तत्पर कर्तव्य सेवेचे त्यांनी विशेष कौतुक केले. त्यानंतर मतदान केंद्राच्या बाहेर येऊन पुन्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
लोकशाहीच्या या उत्सवामध्ये चांगले प्रतिनिधी लोकसभेत पोहोचणे आवश्यक असते. लोकांच्या आकांक्षा ठरवणारा हा दिवस आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी घरातून बाहेर पडून मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान कसे होईल, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मतदार राजाचा कौल कोणाला असेल, यावर उदयनराजे म्हणाले जे जनतेच्या मनात असेल त्यालाच कौल मिळेल आणि अर्थातच मी जनतेच्या मनात आहेच, असे सांगत उदयनराजे यांनी बहुमत आपल्यालाच मिळणार असा ठाम विश्वास व्यक्त केला.
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |