उन्हाळ्यात हिरव्या पालेभाज्या अधिक दिवस टिकत नाही. मेथी, पालक, कांद्याची पात, कोथिंबीर किंवा पुदिन्याची पानं लवकर सुकतात किंवा पिवळी पडतात. उन्हाळ्यात पुदिन्याचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते. पुदिन्याची चटणी, सरबत, स्मुदी, वाटणामध्ये देखील अनेक जण पुदिन्याची पानं घालून पेस्ट तयार करतात. पुदिन्याचा सुगंध आणि चवीमुळे पदार्थ अधिक चमचमीत होतो. पुदिना खाण्याचे जसे आरोग्यदायी फायदे आहेत, तसेच त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठीही मदत करते.
अनेक गोष्टींसाठी याचा वापर होत असल्याकरणाने, आपण एकाच वेळी जास्त पुदिना आणून ठेवतो, व पुदिना निवडून पानं फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवतो. पण ओलाव्यामुळे पुदिना खराब होतो, किंवा त्याची पानं पिवळी पडतात. पुदिन्याची पानं अधिक दिवस फ्रेश ठेवण्यासाठी कोणते उपाय मदत करतील? पुदिना फ्रेश राहण्यासाठी कशापद्धतीने स्टोर करावे? पाहूयात
पुदिन्याची पानं कशी स्टोर करायची?
1) पुदिन्याची पानं अधिक काळ फ्रेश ठेवण्यासाठी बाजारातून चांगली जुडी विकत आणा. त्याची पानं देठापासून निवडून घ्या. नंतर हवाबंद डब्यात एक टिश्यू पेपर ठेवा. टिश्यू पेपरमध्ये पुदिन्याची पानं पसरवून ठेवा, आणि डब्याचं झाकण लावा. डबा आपण फ्रिजमध्ये ठेऊ शकता. या टिप्सच्या मदतीने पुदिना, मिरची, कडीपत्ता आणि कोथिंबीर अधिक काळ फ्रेश राहील.
2) पुदिन्याची पानं अधिक काळ फेश ठेवण्यासाठी, एक जार घ्या, त्यात पाणी भरा. पाण्यामध्ये पुदिन्याच्या देठाची बाजू पाण्यात बुडवून ठेवा. काही वेळानंतर ओल्या कापडामध्ये पुदिना गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवा. पुदिना १० दिवस आरामात टिकेल.
3) पुदिन्याची पानं निवडून झाल्यानंतर धुवून घ्या. फॅनखाली पुदिना वाळवून घ्या. ज्यामुळे त्याच्यातील ओलावा निघून जाईल, व त्यानंतर टिश्यूपेपरमध्ये पुदिना साठवून डब्यात ठेवा. ओलावा पूर्णपणे निघून गेल्यामुळे पुदिना आठवडाभर आरामात टिकेल.
पुदिना खाण्याचे फायदे :
पुदीना अँटीफंगल, अँटीबैक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. शिवाय यात अनेक खनिजे आणि जीवनसत्वे आढळते. मुख्य म्हणजे उन्हाळ्यात आहारात पुदिन्याचा समावेश केल्याने शरीर थंड राहते आणि पचनक्रियाही सुधारते.
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |