कराड : कराडनगरीची ग्रामदैवता श्री कृष्णाबाईची चैत्री यात्रा शनिवारी उत्साहात संपन्न झाली. मंदिर परिसर विद्युत रोषणाई व फुलांनी सजवला होता. तर, सुवर्ण अलंकार आणि भरजरी साडीतील कृष्णाबाईचे देखणे रूप डोळ्यात साठवत भक्तगण नतमस्तक होत होते. यात्रेनिमित्त कराड शहरासह ठिकठिकाणांहून आलेल्या भाविकांनी अवघा कृष्णाघाट परिसर फुलून गेला होता.
कृष्णाबाईच्या सहा दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवाचा शनिवारचा मुख्य दिवस होता. महोत्सवात प्रथेप्रमाणे नित्याने पूजाअर्चा, विधी व धार्मिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न होत आहेत. कृष्णामाईचे दर्शन घेण्यासाठी अगदी सकाळपासून लोकांच्या रांगा लागल्या होत्या. सालाबादप्रमाणे पुरणपोळ्यांचा नेवैद्य दाखवत व श्रीफळ वाढवत हजारो भक्तगणांनी कृष्णामाईचे मंगलमय वातावरणात दर्शन घेतले. दरम्यान, प्रसाद, मिठाईसह खेळणी विक्रीची दालने, खाद्य पदार्थांचे हातगाडे गर्दीने फुलून गेले होते.
हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी ‘श्रीं’ची सवाद्य पालखी मिरवणूक निघाली आणि सालाबादप्रमाणे मंडपात ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना होऊन कृष्णामाई यात्रा महोत्सवाचा शुभारंभ झाला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी ‘नवचंडी याग’ संपन्न झाला. तर ‘सुनहरी यादे’, भजन, हळदी कुंकू, पूजाअर्चा असे कार्यक्रम होत राहिले. दररोज महाप्रसादही वाटप होत आहे. रविवारी सकाळी ढोल ताशांच्या गजरात कृष्णाबाईची पालखीतून नगरप्रदक्षिणा झाली.
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |
धर्मादाय कार्यालयाचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात |
सातार्यात चौथ्या दिवशी वळवाच्या जोरदार सरी |
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करणार |
युध्द नव्हे तर शांतीच माणसाला गरजेची : लक्ष्मीकांत देशमुख |
नीरा उजवा कालव्याला मोठी गळती |