09:11pm | May 13, 2024 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये वळवाच्या पावसाच्या जोरदार सरी सोमवारी कोसळल्या. चौथ्या दिवशी वळवाचा पाऊस झाला असून सातारा शहरात ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. पाऊस आल्यानंतर सातारा शहरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
हवामान विभागाने अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे वारंवार तयार होत असल्याने 16 मे पर्यंत वळवाच्या पावसाची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे सलग चौथ्या दिवशी सातारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दीड महिन्यामध्ये सातारकरांनी तीव्र स्वरूपाचा उन्हाळा अनुभवला. काहीवेळेस सातार्याचा पारा चाळीस अंशावर गेला होता. उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून दुपारनंतर संपूर्ण वातावरण पर्जन्य सदृश्य होत असून सलग चार दिवस सातारा शहर परिसर आणि जिल्ह्याच्या काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. वळवाच्या जोरदार सरी सोमवारी सायंकाळी चारच्या नंतर सुमारे तासभर बरसल्या. ढगांच्या गडगडाटात वादळी वार्यासह पाऊस सुरू आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कराड तालुक्यात काही ठिकाणी घराचे पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले. सातारा शहरात सोमवारी आरटीओ परिसरात झाडाची फांदी कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. सातारा, कराड, महाबळेश्वर व पाटण या चार तालुक्यात वळवाच्या जोरदार सरी बरसल्याचे वृत्त आहे. जिल्ह्याच्या या भागांमध्ये सायंकाळी चार नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. सातारा शहरात पावसामुळे काही काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |