09:08pm | May 13, 2024 |
सातारा : दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने राबविलेले उपक्रम अत्यंत स्तुत्य असून प्रशासनिक स्तरावर संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करु. याचबरोबर शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहे.
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी डूडी यांनी संस्थेच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक करपे, अप्पर पोलीस अधीक्षक सौ. आंचल दलाल, सातारा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ढेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, शासन स्तरावर दिव्यांगांसाठी विविध सोयी-सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. त्यानुसार आमची वाटचाल सुरु आहे. दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने राबविलेले उपक्रम व संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांची दिव्यांगांबाबत असलेली आस्था, कळकळ ही कौतुकास्पद आहे. अजय पवार यांच्या माध्यमातून आम्हास दिव्यांगांना होणार्या गैरसोयीचेही आकलन होत असते. आम्ही त्यावरही लवकरात लवकर उपाययोजना करीत असतो. दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेला कोणतीही अडचण आल्यास दिव्यांगांनी माझ्या कार्यालयाकडे संपर्क साधावा, असेही आवाहन डूडी यांनी केले.
यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अजय पवार म्हणाले, दिव्यांगांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. दिव्यांग माता-भगिनींनाही येणार्या अडचणी आम्ही शासन दरबारी मांडत आहोत. वेळप्रसंगी मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही निवेदने देवून, आंदोलने करुन दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी मी कटिबद्ध आहे. ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत, त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु असून जिल्हाधिकारी या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत, असेही पवार म्हणाले.
यावेळी शैलेंद्र बोर्डे, अमोल निकम, अमोल भातुसे, रवी गाडे, पांडुरंग शेलार, संजय प्रकाशे, प्रेमनाथ कदम, भाजप दिव्यांग सेल आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक खडंग, सुरेश बाबा माने, नामदेव इंगळे, अविनाश कुलकर्णी, महिला पदाधिकारी सौ मंदाकिनी गाडे, सौ सुनंदा ढेब, सौ लतिका जगताप, सौ शोभा मोरे, श्रीमती सुनीता ओंबळे, सौ. शालन लोंखडे, सौ. माधुरी देशमुख, श्रीमती चंपाबाई क्षीरसागर, प्रहार दिव्यांग क्रांतीच्या तालुकाध्यक्ष समीना शेख तसेच संस्थेचेे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल निकम यांनी केले, आभार रवी गाडे यांनी मानले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |