पुणे : महापालिका व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी मॉडेल) ना नफा ना तोटा तत्त्वावर आठ ठिकाणी डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या सेंटरवर अवघ्या ४०० रुपयांत डायलिसिस होत असून, गेल्या दोन वर्षांत येथे तब्बल ६९ हजार ४९४ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात आठ ठिकाणी डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आली आहेत. यापैकी दोन सेंटरमधील मशीन महापालिकेच्या मालकीची आहेत. उर्वरित सहा सेंटर खासगी संस्थांना चालवण्यास देण्यात आली आहेत. सर्व डायलिसिस सेंटरमधील एकूण ५७ मशीन आहेत. त्यापैकी सर्वात जास्त व एकूण सेंटरच्या तुलनेत सुमारे ५० टक्के डायलिसिस कमला नेहरू रुग्णालयातील सेंटरवर झाले आहेत.
बदललेली जीवनशैली, खाण्याच्या बदललेल्या सवयी, मधुमेहाचे वाढते प्रमाण आदी कारणांमुळे किडनी विकार वाढले आहेत. त्यामुळेच किडनी निकामी होण्याचेही प्रमाण वाढत आहे. भारतामध्ये साधारणपणे दरवर्षी एक लाख रुग्णांना किडनीचे आजार उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. अशावेळी या रुग्णांना नियमितपणे डायलिसिस सेवा मिळावी, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे.
किडनी निकामी झालेल्या रुग्णांना आठवड्यातून किमान तीनवेळा डायलिसिसची आवश्यकता भासते. यासाठी खासगी रुग्णालयात सुमारे दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो. परंतु, महापालिकेच्या डायलिसिस सेंटरमध्ये रुग्णांना ४00 रुपये दराने डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
सेंटरचे नाव व पत्ता - मशीन संख्या - डायलिसिस झालेले रुग्ण
कमला नेहरू रुग्णालय - १२ - ३८९१७
राजीव गांधी रुग्णालय येरवडा - १० - १७७१८
कै. चंदूमामा सोनवणे हॉस्पिटल, भवानी पेठ - ४ - ३१८५
कै, शिवरकर दवाखाना, वानवडी - १० - ४६१५
कै. अरविंद गणपत बारटक्के दवाखाना, वारजे - ४ - १८१०
कै. रखमाबाई थोरवे दवाखाना, आंबेगाव - ७ - ५०३
कै. मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह, कोंढवा - १० - ५५२४
कै. द्रौपदाबाई खेडेकर दवाखाना, बोपोडी - १० - १८७
.............
एकुण - ६९ हजार ४९४
महापालिकेच्या वतीने पीपीपी तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरमध्ये गरीब व गरजू रुग्णांना डायलिसिससारखे महागडे उपचार अत्यल्प दरामध्ये उपलब्ध होतात. या प्रकल्पांतर्गत २०२२ ते मार्च २०२४ पर्यंत ६९ हजार ४९४ रुग्णांनी डायलिसिसचा लाभ घेतला आहे. - डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, महानगरपालिका
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |