01:40pm | Apr 30, 2024 |
पुणे : अपघात, ह्रदयविकाराचा धक्का, प्रसूती आदी तातडीची उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना मोफत रुग्णवाहिका सेवा देणाऱ्या ‘डायल १०८’ या रुग्णवाहिकेने गेल्या दहा वर्षांत ८ लाख ८२ हजार ४५२ रुग्णांना पुण्यात मोफत रुग्णवाहिकेची सेवा दिली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजेच ६० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे वैद्यकीय आणीबाणीचे व त्या खालोखाल प्रसूतीचे आहेत.
डायल १०८ मोफत रुग्णवाहिका सेवा ही राज्यात सन २०१४ साली तत्कालीन सरकारने सुरू केली होती. बीव्हीजी आणि राज्य सरकारचा हा संयुक्त उपक्रम असून, या सेवेला सुरू होऊन एक दशक पूर्ण होत आहे, तेव्हापासून आतापर्यंत कार्यक्षमतेने आणि शिस्तीने सुरू असलेला हा उपक्रम आहे. त्यामुळे सर्वसामान्य व तातडीच्या रुग्णांना मोफत रुग्णवाहिका सेवा मिळत आहे. एखाद्या रुग्णाला तातडीने दाखल करायचे झाल्यास माेबाइलवरून १०८ नंबर डायल केल्यास व माहिती दिल्यास शहरात १० मिनिटांत, तर ग्रामीण भागात १५ मिनिटांत ही रुग्णवाहिका घटनास्थळी येते.
मेडिकल इमर्जन्सीचे रुग्ण सर्वाधिक :
सर्वाधिक सेवा ही मेडिकल इमर्जन्सीच्या रुग्णांना देण्यात आली. त्यांची आकडेवारी ५ लाख ५८ हजार इतकी आहे. यामध्ये हार्टअटॅक, पॅरालिसिस किंवा स्ट्राेक, डेंग्यू, न्युमोनिया, टीबी, मलेरिया, उष्माघात, चक्कर येऊन पडणे या प्रकारच्या रुग्णांचा समावेश होतो. ही आकडेवारी एकूण रुग्णांच्या तुलनेत ६३ टक्के इतकी प्रचंड आहे.
प्रसूतीच्या महिलांनाही लाभ :
वैद्यकीय आणीबाणीनंतर या सुविधेचा सर्वाधिक लाभ काेणाला झाला असेल, तर ताे प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांना झाला आहे. गेल्या दहा वर्षांत पुणे शहर व जिल्ह्यांत १ लाख ४२ हजार गर्भवतींना रुग्णवाहिकेची सेवा मिळाली. एकूण रुग्णांच्या तुलनेत यांची संख्या १६ टक्के आहे, तसेच काही महिलांची दवाखान्यात घेऊन जात असताना रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली आहे.
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |