11:33am | May 08, 2024 |
सातारा : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व स्वीप कक्षाच्या जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केलेल्या आवाहनाला रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता उमेद अंतर्गत कार्यरत टीमने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उमेद मध्ये कार्यरत प्रेरिकांनी गृहभेटी, प्रत्यक्ष पात्र मतदारांची भेट घेऊन मतदानासाठी घराबाहेर पडून मतदान करण्यास प्रोत्साहित केले. यामुळेच गत वर्षीपेक्षा उन्हाची तीव्रता अधिक असूनही गतवेळच्या तुलनेत मतदानाचा टक्का लक्षणीयरित्या वाढला. गत वेळी ६०% टक्के मतदान सातारा लोकसभे साठी झाले होते.यंदा हेच मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत 54 % इतके झाले असून जिल्हयाचा अंतिम मतदानाचा टक्का गतवर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे.
स्विप कक्षाच्या नोडल अधिकारी याशनी नागराजन यांनी सातारा जिल्ह्यातील शंभर टक्के मतदान करून घेण्यासाठी 2 मे 2024 पासून जोरदार तयारी केली होती. जिल्हा विकास प्रशासन आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यामध्ये सक्रिय सहभागी झाले. यामध्ये गाव पातळीवर कार्यरत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद टीमने याशनी नागराजन व प्रकल्प संचालक संतोष हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहाचा वाटा उचलला आहे.
मतदान टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले यामध्ये मोटर सायकल रॅली, पोस्टर प्रदर्शन, गृह भेटीद्वारे पत्रक वाटप करण्यात आले. याबरोबरच मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी युट्युब लाईव्ह च्या माध्यमातून उमेद अंतर्गत कार्यरत सुमारे १० हजार महिलांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधत मतदान वाढवण्यासाठी कशा पद्धतीने कार्यवाही करावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
यामुळे जिल्ह्यातील सुमारे 15,187 बचत समूह , 967 ग्राम संघ आणि 51 प्रभाग संघाच्या बैठका घेवून या माध्यमातून सुमारे 17000 समुदाय संस्थांचे सदस्य पदाधिकारी कंबर कसून मतदार जनजागृतीसाठी मैदानात उतरले.
उमेद टीमने रखरखत्या उन्हाची कसलीही पर्वा न करता ग्रामीण भागातील प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून सुमारे 9 लाख मतदारांचे मतदानाविषयी समुपदेशन केले. याशिवाय उमेद टीमने मतदानादिवशी ही आपली जबाबदारी 100 % बजावताना , वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक व्यक्ती मतदार केंद्रापर्यंत जाऊन प्रत्यक्ष मतदान कसे करेल यासाठी नियोजन केले. कोणाचे मतदान झाले कोणाचे मतदान होणे बाकी आहे याची माहिती घेत ज्यांचे मतदान राहिले आहे त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे काम केले.
सातारा जिल्ह्यामध्ये गत पंचवार्षिक मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील टक्का वाढवण्यासाठी विकास प्रशासनाच्या कुटुंबप्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केलेल्या अवाहानास उमेद टीमने प्रतिसाद देत मतदानाचा टक्का वाढवून दाखविला.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |