07:12pm | Feb 25, 2022 |
आज मराठी राजभाषा दिन, कविश्रेष्ठ वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती. या निमित्ताने मराठी भाषेचा उगम, तिचा इतिहास याचा घेतलेला धांडोळा...
मराठीचा आद्यग्रंथ 'लिळाचरित्र" महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीं यांच्या आठवणींच्या आठवातून निर्माण झालेले अक्षरलेणे आहे. म्हणून ग्रंथदिंडीत मानाचे पहिले स्थान या ग्रंथाचेच आहे. केवळ चरित्र ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे विवेचन करता येत नाही, तर ज्या दृष्टिकोनातून अभ्यासक या ग्रंथाचे संशोधन करतो. त्या दृष्टीने अधिकाधिक वैशिष्ट्यांची माहिती हा ग्रंथराज देतो. मराठी ललित गद्यांची मुहूर्तमेढ रोवण्याचा पहिला मान या ग्रंथाकडे जातो.
महानुभाव पंथाच्या वांड्मयीन कामगिरीची थोरवी मराठी भाषेचा प्रत्येक अभ्यासक मान्य करतो.मराठी सारस्वताला अनेक प्रकारच्या वाड्मयीन लेण्याने सजविण्याचे कार्य या पंथातील विद्वानांनी केले आहे. पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामींच्या काळी महाराष्ट्रात देवगिरीच्या यादव राजांची राजवट सुरू होती. यादव राजे वैदिक संस्कृतीचे, विद्या व कलेचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे वाड्मयदृष्ट्यालाही हा काळ तसा भरभराटीचा होता. पण सामाजिक परिस्थिती सुदृढ नव्हती. अशा पाश्र्वभूमीवर समाजाच्या उद्धारासाठी सर्वज्ञांनी मराठीचा पुरस्कार केला. पंथातील सर्व प्रकारचे कार्य मराठीतूनच करण्याचे व्रत त्यांनी स्वतः अंगीकारले. आणि त्यांच्या शिष्यवर्गाने घेतलेला वसा पुर्ण करण्याचे काम केले. आजही या पंथातील शिष्यगण अभिमानाने मराठीचा पुरस्कार करतात. पंथातील लीळाचरित्र, दृष्टांतपाठ, स्मृतीस्थळ, सूत्रपाठ आदी ग्रंथातून तत्वज्ञानासारखा विषय जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य मराठीतून जाणीवपूर्वक केल्याचे प्रत्ययास येते.
जिये भाषेचीये रसवृतीः
सा भाषांचे कुपे कीजेती निगुतीः
ते मराठी कवण जाणें निरूत्ती :
जे रसांचे जीवन !
महानुभाव पंथातील प्रसिद्ध कवी नरेंद्राने मुक्तकंठाने मराठी भाषेची थोरवी गायली आहे. नरेंद्र हे व्युत्पन्न पंडित होते. संस्कृत भाषा उत्तम प्रकारे अवगत असतानाही त्यांनी मराठीतून रुक्मिणी स्वयंवर लिहिले .ते प्राचीन मराठीतील उत्कृष्ट आख्यान काव्य असून आज त्या काव्याला मराठीतील पहिले महाकाव्य म्हणून समजण्यात येते.
मुख्यतः मराठी ललित गद्यांची मुहूर्तमेढ रोवण्याचा पहिला मान महानुभाव या पंथाकडे जातो. लीळाचरित्रातून सूत्रपाठ ,दृष्टांत पाठ, रत्नमालास्त्रोत, भाष्य, महाभाष्य, बंद आदी ग्रंथांची निर्मिती झाली. महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाचा आधार म्हणजे लीळाचरित्र आहे. असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही.
कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परिस्थितीत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी केवळ यादव काळातच नव्हे, तर श्री सर्वज्ञांची शिकवण ही आजच्या काळाची गरज आहे. लीळाचरित्र, दृष्टांतपाठ ही लोकजागृती आणि लोकप्रबोधनाचे उत्कृष्ट ग्रंथ आहेत. कथांमधून, दाखल्यां मधून साध्या साध्या उदाहरणांमधून महत्त्वाचे तत्त्व पटवून सांगण्याचे कठीण काम या ग्रंथातून साधले गेले आहे. साधीसुधी, लयबद्ध, नेटक्याच अलंकारांनी सजलेली, प्रवाही आणि मधुर भाषाशैली हेही या ग्रंथाच्या यशाचे गमक आहे, हे विसरता येत नाही.
श्री गोविंदप्रभु चरित्र या ग्रंथातून श्री गोविंदप्रभुंचे जीवन स्मृतीरूपाने रंगविलेले आहे.राऊळ माय,राऊळ बाप म्हणून पंथात श्री गोविंदप्रभु चे चवथे परमेश्वरावतार म्हणून स्थान आहे. अनेक प्रसंगी त्यांनी शिष्यांना म्हटलेले "आवो मेली जाये" म्हणजे श्री गोविंदप्रभूंच्या ठिकाणी असलेल्या वात्सल्याचे प्रतीक आहे.
आद्य कवयित्री महदंबेने धवळ्यांची निर्मिती केली. प्राचीन मराठी सारस्वतात आणखी एका अवीट गोडीच्या लेण्याची भर पडली. मातृकी रूक्मिणी स्वयंवराची रचनाही महदंबेने केली. स्वाभाविकता, सहजसुंदरता आणि साधेपणातून काव्य सजीव करण्याचे कौशल्य महदंबेच्या शैलीतून जाणवते ओव्या, आरती, स्फुट रचना महदंबेच्या नावावरआहेत. मराठीतील आद्य कवयित्री म्हणून तिचे स्थान मोठे आहे.
महानुभाव पंथातील सातही ग्रंथ प्रसिद्ध आहेत. नरेंद्राचे रुक्मिणी स्वयंवर, भास्करभट्ट बोरीकरांचे 'शिशुपालवध आणि उद्धवगीता'' अथवा एकादश स्कंध, दामोदर पंडीतांचे वछाहरण, पंडीत विश्वनाथाचे ज्ञानप्रबोध, रवळोबास रचित 'सह्याद्रीवर्णन' आणि नारायण पंडितांचे 'ऋद्धिपूरवणन' हे ग्रंथ पंथीय पंचकृष्णाच्या जीवनातील प्रसंगावर लिहीलेले काव्य आहे. परमेश्वराची ज्ञानयुक्त भक्ती ही या ग्रंथाच्या निर्मितीमागील प्रेरणा आहे. भक्तीचा मळा ग्रंथातून फुलविणारे सातही ग्रंथकर हे व्युत्पन्न पंडित , विद्वान आहेत. कवीचे मन असणाऱ्या या ग्रंथकारांची ही प्रबंधकाव्ये म्हणजे मराठीला लाभलेले अमोल देणे आहे.
मराठी भाषेची वैविध्यपूर्ण रूपे...
महानुभाव पंथाचे गद्य वांड्मय आणि पद्य वाड्मय दोन्ही वाड्मयप्रकार समृद्ध आहेत. गद्य वाड्मयात आठवणी, लिळा, हकिगती, आख्यायिका, आत्मकथन, वृत्तकथन, चरित्रचित्रण, दैनंदिनी, श्रुती, स्मृती, अर्थनिर्णय, विवरण, भाष्य, महाभाष्य, प्रमेयसिध्दांत, संकलन, संपादन, गीताटिका, टीपग्रंथ,इत्यादी प्रकारचे लेखन संस्कृत भाषेची जाण असलेल्या, त्या भाषेचा उत्तम अभ्यास असलेल्या विद्वान ग्रंथकारांनी मराठी भाषेतून सुंदर रीतीने केलेले आहे. पद्य विभागात दीर्घ काव्य , महाकाव्य, प्रबंधकाव्य, तत्त्वकाव्य कथाकाव्य, चरित्रकाव्य, स्फुटकाव्य, आरत्या, चौपद्या, रूपकरचना यांची निर्मिती केलेली आहे.
मराठी वैभवसंपन्न...
परमेश्वराची ज्ञानयुक्त भक्ती आणि पंथाबद्दल असलेली श्रद्धा यातून निर्माण झालेल्या महानुभाव पंथाच्या वाड्मयाने प्राचीन मराठीला वैभवसंपन्न केले आहे. आर्ततेने परमेश्वराची आराधना करण्यासाठी निर्माण झालेल्या साहित्यातून पंथीय साहित्यीकांनी मराठी भाषेचा गौरव केला. मराठी भाषा समृद्ध आहे, संपन्न आहे, तिच्यात विचार अभिव्यक्त करण्याचे सामर्थ्य आहे, ती ललितपुर्ण आहे. ती केवळ येरागबाळ्यांची भाषा नाही, तर उत्कृष्ट साहित्याची निर्मिती करणारी साहित्यिकांची भाषाआहे.ही जाणीव करून देणारेमहानुभावीय वाड्मय म्हणूनच प्राचीन मराठीची संपदा आहे.
अंगापुरातून अल्पवयीन मुलीला पळविले |
ट्रक दुकानात घुसून नुकसान |
आरटीओ परिसरातील पत्रा शेडची अतिक्रमणे पालिकेने हटवली |
महाविकास आघाडी लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आता झाले प्रादेशिक परिवहन कार्यालय |
‘स्वच्छ दहिवडी’साठी नगरसेवकानेच घेतली घंटागाडी हातात |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
खिंडवाडी येथून डंपरची चोरी |
दोन वेगवेगळ्या घटनेत युवक व युवती बेपत्ता |