09:04pm | May 05, 2024 |
सातारा : गळा आवळून तसेच डोक्यात दगड घालून करण्यात आलेल्या खुनाची उकल केवळ दोन तासात करण्यात दहिवडी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका अल्पवयीनासह चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रामचंद्र ज्ञानू जगदाळे, कुसुम रामचंद्र जगदाळे, शैला सचिन जाधव आणि एक अल्पवयीन बालक यांना या खून प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज दि. 5 मे रोजी पहाटे 6 वाजण्याच्या पूर्वी शिरवली, ता. माण, जि. सातारा येथील दादा रामचंद्र जगदाळे यांचा त्यांच्या राहत्या घरासमोर असणाऱ्या अंगणात अज्ञाताने गळा आवळून तसेच त्यांच्या डोक्यात कशाने तरी मारून खून केला असल्याबाबतची तक्रार मधुकर ज्ञानदेव पाटील या शिरवली, ता. माण येथील पोलीस पाटलांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, दहिवडी-वडूजच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी या गुन्ह्यातील अज्ञात आरोपी बाबत माहिती काढून त्यास ताब्यात घेण्याच्या सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना दिल्या. त्याप्रमाणे सोनवणे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे यांच्यासोबत तपास पथक तयार केले.
दरम्यान, दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत घरातील लोकांकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, पहाटेच्या सुमारास कुत्री जोरजोराने भुंकत असल्याने मयताचे वडील घराबाहेर आले. त्यावेळी त्यांना त्यांचा मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसून आला. त्याचवेळी त्यांच्या घरा समोरून चार ते पाच लोक पळून जाताना दिसल्यामुळे त्यांनी घरातील इतर लोकांना उठवले. त्यावेळी घराच्या बाहेर लावलेला बल्ब कोणीतरी काढून ठेवला होता. तसेच मयताचा मोबाईल त्याच्याजवळ नव्हता, अशी माहिती सांगून दरोड्यासह खून असा बनाव रचला.
मात्र, त्यांनी सांगितलेली हकीकत आणि घटनास्थळाची परिस्थिती यामध्ये विसंगती तसेच संबंधित बनाव करत असल्याचा संशय आल्याने सोनावणे यांनी स्टाफ सह घरात जाऊन पाहणी केली असता मयताचा मोबाईल घरात सापडला. त्यामुळे पुन्हा याबाबत प्रतिप्रश्न केले असता घरातील लोक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन सत्य परिस्थिती विचारली असता संबंधितांनी सांगितले की, मयत व्यक्ती हा दारू पिऊन घरच्यांना वारंवार घाणेरड्या शिव्या तसेच त्याच्या वहिनीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर वाईट नजर ठेवून होता. याचबरोबर आई-वडिलांना मारहाण करणे, दारूसाठी पैसे मागणे, पुतण्याला व वहिनीला मारून टाकण्याची धमकी देणे यांसारखे प्रकार करत असल्याने त्या त्रासाला कंटाळून शिरवली गावच्या यात्रेनिमित्त घरी आलेल्या मयताची बहीण, त्याचा अल्पवयीन पुतण्या, त्याचे आई वडील यांनी कट रचून मयत हा दारू पिऊन झोपल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर त्याने प्रतिकार करायला चालू केल्यानंतर त्याचे हातपाय पकडून जनावर बांधण्याचे दोरीने त्याचा गळा आवळून निर्घृन खून केला. अशा रीतीने हा खुनाचा गुन्हा अवघ्या दोन तासात दहिवडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, पोलीस अंमलदार प्रकाश हांगे, बापू खांडेकर, प्रकाश इंदलकर, विजय खाडे, स्वप्निल म्हामणे, पुनम रजपूत, महेश सोनवलकर, रामचंद्र गाढवे, आजिनाथ नरबट, महेंद्र खाडे यांनी सहभाग घेतला.
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |