02:44pm | Nov 27, 2023 |
सकळाच्या नाश्त्याला रोज काय नवीन करावं ते अनेकदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट तयार होणारे पदार्थ बनवू शकता. यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि घरातील सगळेजण आवडीने खातील. तांदळाचा ढोकळा करण्याची सोपी रेसिपी पाहूया. ढोकळा बनवायचा म्हणलं की डाळ भिजवणं, डाळ दळणं अशा प्रकिया कराव्या लागतात पण तुम्ही यातलं काहीही न करता अगदी सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही मऊ, फुललेला ढोकळा बनवू शकता.
तांदळाचा ढोकळा करण्यासाठी काय साहित्य लागते?
1) स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ- १ वाटी
२) ताजे दही - १ वाटी
३) हिंग- पाव टिस्पून
४) आल्याचे तुकडे- १ इंच
५) हिरव्या मिरच्या - २ ते ३
६) मीठ- चवीनुसार
७) इनो- १ पाकीट
फोडणीसाठी
१) मोहोरी- एक टिस्पून
२) कढीपत्ता- ८ ते १०
३) भाजलेली चण्याची डाळ- १ ते २ चमचे
४) तेल - गरजेनुसार
ढोकळा बनवण्याची कृती
१) सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात १ कप तांदूळ काढून घ्या त्यानंतर त्यात १ कप दही, आल्याचे तुकडे, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि मीठ घालून एकजीव करून घ्या. नंतर हे मिश्रण दळून एका भांड्यात काढून घ्या. त्यात वाटीभर रवा घाला आणि १० मिनिटं झाकून ठेवा.
२) एका फोडणी पात्रात तेल गरम करून तेलात मोहोरी, हिंग, कढीपत्ता, मिरची, भाजलेली चण्याची डाळ घालून फोडणी तयार करून घ्या. ही फोडणी तयार ढोकळ्याच्या मिश्रणात घाला. त्यात इनो आणि थोडं पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
३) एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवून त्यावर रिंग ठेवून ढोकळ्याचे बॅटर त्यात भरून हे भांडे रिंगवर ठेवा. ढोकळ्याला रंग येण्यासाठी मिश्रणात वरून लाल तिखट घाला. १० ते १५ मिनिटांनी ढोकळा बनून तयार होईल. तयार ढोकळा चटणीबरोबर सर्व्ह करा.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |