पारंपारिक 18 प्रकारच्या कारागीरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांची उन्नती करण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कारागिरांना प्रशिक्षण 15 हजार चे टूल किट व 1 लाख रुपयांपर्यंत अर्थ सहाय्य बँकेमार्फत 5 टक्के दराने देण्यात येणार आहे. या योजने विषयी थोडक्यात……
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना वैशिष्टे व फायदे :
पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या 18 प्रकारच्या पांरपारिक कांरागीरांना पाच दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पाच दिवसीय प्रशिक्षण कालावधीत पाचशे रुपये (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र प्रधान केले जाणार आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या या कारागीरांना टुल किट खरेदीसाठी ई व्हौचर दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या कारागीरास व्यवसाय सुरु करण्यासाठी 5 टक्के व्याज दरासह एक लाख रुपयाचे कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करुन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी https://pmvishwakarma.gov.in/ या संकेत स्थळाला भेट द्यावी.
कोणाला लाभ घेता येणार आहे :
सुतार, लोहार,सोनार, कुंभार, न्हावी, फुल माळ करणारे, धोबी, शिंपीं, मेस्त्री, बांबू उद्योग, मुर्तिकाम, चर्मकार, शस्त्रकार, बोट बांधणारे, अवजारे बनवणारे, चावी बनवणारे, खेळणी बनवणारे व मासेमारी जाळी विणणारे.
आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड,बँक पासबुक, मोबाईल नंबर (आधार लिंक असावे) फोटो, शिधापत्रिका इ. कागदपत्रे
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन :
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी वारंवार बैठका घेत आहेत. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेत विशेष लक्ष देवून जास्तीत जास्त लाभार्थीना लाभ मिळवून देण्यासाठी योजनेचा प्रसार-प्रचार करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
पात्र कारागीरांचा या योजनेत समावेश करावा व गाव पातळीवर संरपच, ग्रामसेवक यांनी जास्तीत लोकांना या योजनेचा फायदा घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, तसेच पात्र लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र प्लॉट नं. ए.13, एमआयडीसी, सातारा दूरध्वनी क्रमांक 02162-246016 येथे संपर्क साधावा.
संकलन जिल्हा माहिती कार्यालय, सातारा
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |