09:01pm | May 05, 2024 |
सातारा : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासारखा सच्चा पुरोगामी व छत्रपतींच्या गादीचे विद्यमान वारसदार निवडून यावेत यासाठी सर्व समाज जाहीर पाठिंबा देत आहे. त्यामुळे आता मताधिक्य किती ? याची उत्सुकता लागली असल्याचे मत इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे व दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सातारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवडणुकीकडे देश नव्हे तर परदेशातही लक्ष लागून राहिलेले आहे. कारण, हा छत्रपतींच्या गादीचा मान आहे. मत सुद्धा छत्रपतींना आहे. ते सर्वांचे दैवत आहेत. तसेच राष्ट्रीय अभ्यासक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीची त्यांना जाण असून मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. गेली 40 वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इयत्ता चौथीच्या इतिहास पुस्तकात चुकीचा संदर्भ घेऊन इतिहास सांगितला जात होता. ही बाब जेव्हा त्यांच्या समजली. त्यावेळी त्यांनी ताबडतोब सरकारला हे पुस्तक बदलण्यास भाग पाडले. त्यामुळे असा लोकराजा असलेल्या नेत्याला निवडून देणे, हा सातारच्या गादीचा सन्मान आहे, असे स्पष्ट केले.
जात, धर्म यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करणारे ते लोकशाहीतील खरेखुरे राजे आहेत. पक्षांतर्गत प्रक्रिया असते ती प्रक्रिया पूर्ण झाली असून ते कोणत्याही पदासाठी झुकणारे व्यक्तिमत्व नाही. त्यामुळेच त्यांना सर्व समाजाकडून पाठिंबा मिळत आहे. आम्ही छत्रपतींचे मावळे असून संविधानात्मक बोलतो, असे कोकाटे यांनी स्पष्ट केले.
तसं पाहिलं तर छत्रपतींची गादी म्हणून उदयनराजे भोसले निवडून नक्कीच येतील. पण, त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य देणे, हे त्यांच्या गादीचा मान राखण्यासारखा होईल. लोकराजा असलेले उदयनराजे भोसले यांच्या विजयाकडे संपूर्ण देशाचे नव्हे तर परदेशाचेही लक्ष लागलेले आहे. भाजपने काय केलं तर भाजपने जे कॉंग्रेसला करता आले नाही ते केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, लंडनचे घर स्मारक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव या ठिकाणी स्मारक, लहुजी वस्ताद यांचे स्मारक आणि मागासवर्गीयांना शिक्षणामध्ये व अनेक ठिकाणी त्यांची गुणवत्ता वाढीसाठी बार्टी, आरर्टी अशा संस्था उभ्या करण्याचे काम हे भाजप म्हणजेच महायुतीने केलेले आहे. खरं म्हणजे कोल्हापूरची गादी ही धाकटी आहे. त्या गादीच्या महाराजांना निवडून द्या आणि थोरल्या गादी बद्दल वेगळी भूमिका घेणारे शरदचंद्र पवार यांना त्यांच्या पुतण्याने चोख उत्तर दिलेले आहे. त्यामुळे आपल्याला छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडून देण्यासाठी व मताधिक्य देण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला सातारा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, सामाजिक कार्यकर्ते व दलित चळवळीतील खंदे समर्थक पोपट उमापे, उमेश खंडझोडे, अमोल पाटोळे उपस्थित होते.
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |