11:34am | Apr 29, 2024 |
कराड : महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे देशासाठी असलेले अमूल्य योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी मानसपुत्राने केंद्र सरकारकडे शिफारस का केली नाही, असा सवाल महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.
उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून त्या ठिकाणी महायुतीच्या संकल्पनामाचे जाहीर प्रकाशन केले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी कराड येथे होणाऱ्या जाहीर सभेत मी करणार आहे. अशी मागणी करण्याची वेळ आत्ताच का काढली? असे ही विरोधक म्हणत आहेत. मात्र आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचे भांडवल करून यापूर्वी कधीही मते मिळवली नाहीत. पण त्यांच्या प्रति आदर व्यक्त नक्कीच करणार. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट जाहीरपणे सांगण्याची हीच वेळ योग्य आहे. ते पुढे म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघातील 18 लाखापेक्षा जास्त मतदारांपैकी एकही चारित्र्यवान उमेदवार मानसपुत्र म्हणून घेणाऱ्यांना मिळालेला नाही. उलट घोटाळा प्रकरणातील आरोपिंना सहानुभूती मिळेल असे विरोधक सांगत आहेत, वास्तविक घोटाळेबाजांनी सहानुभूतीची अपेक्षा करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. विरोधक रडीचा डाव खेळत तर आहेतच परंतु कष्टकरी , शेतकरी,माथाडी बांधवांना रडवण्याचा डाव देखील खेळत आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न देण्याची उदयनराजे यांनी केलेली मागणी अत्यंत रास्त आहे. चव्हाण साहेबांचे देशासाठी योगदान अमूल्य आहे. त्यांनी जपलेली संस्कृती आणि जीवनमूल्य त्याच्या बळावर त्यांना भारतरत्न देण्याची कार्यवाही होऊ शकते.
स्वतःला पद्मविभूषण घेतले...
कथित मानसपुत्राला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला; परंतु आपल्या गुरुला देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न मात्र केले नाहीत, अशी टीका देखील उदयनराजे भोसले यांनी केली.
मोदींच्या सभास्थळाची पाहणी :
कराड तालुक्यातील सैदापूर येथे 29 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभा स्थळाची पाहणी उदयनराजे भोसले भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे लोकसभा प्रभारी अतुल भोसले, धैर्यशील कदम, मनोजदादा घोरपडे आदींनी केली.
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |
धर्मादाय कार्यालयाचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात |
सातार्यात चौथ्या दिवशी वळवाच्या जोरदार सरी |
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करणार |
युध्द नव्हे तर शांतीच माणसाला गरजेची : लक्ष्मीकांत देशमुख |
नीरा उजवा कालव्याला मोठी गळती |