02:20pm | Mar 08, 2024 |
आज ८ मार्च. जागतीक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांचा जागर होईल. शिवाय आज तिचा दिवस असल्याकारणाने तिच्या कार्याचे कौतुकही करण्यात येईल. सामाजिक असो किंवा राजकीय. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. मुख्य म्हणजे ती स्वतःचा नंतर आधी लोकांचे विचार करते (Health Tips). आंतरराष्ट्रीय महिला दिन ही केवळ महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी नाही तर, त्यांना आरोग्याबाबत जागरूक करणं देखील तितकेच गरजेचं आहे.
तिशीनंतर काही महिलांचे हाडं कमकुवत होतात, आरोग्य ढासळते पौष्टीक घटकयुक्त आहाराच्या कमतरतेमुळे आरोग्य बिघडते. जर आपल्याला तिशीनंतरही कायम सुदृढ आणि फिट राहायचं असेल तर, आपल्या आहारात ५ विशेष पदार्थांचा समावेश करा.
यासंदर्भात, पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा सांगतात; महिलांना सुदृढ शरीर हवे असेल तर, आपल्या आहारात पौष्टीक घटकांचा समावेश करणं गरजेचं आहे. ज्यात मुख्य म्हणजे प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त पदार्थांमुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात. ज्यामुळे तिशीनंतर आपल्याला हाडांच्या निगडीत समस्या उद्भवणार नाही.'
महिलांसाठी कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त आहार का गरजेचं?
कॅल्शियमयुक्त आहार फक्त मजबूत हाडांसाठी नसून, दातांसाठीही फायदेशीर ठरते. कॅल्शियम हाडांचा मुख्य घटक आहे. तिशीनंतर शरीराला कॅल्शियमची गरज भासते. ज्यामुळे हाडं मजबूत होतात. मजबूत हाडे केवळ फ्रॅक्चर होण्यापासून नसून, ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांचा धोका देखील टळतो.
- प्रोटीनयुक्त आहार खाल्ल्याने वजन कण्ट्रोलमध्ये राहते, यासह दीर्घकाळ पोट भरलेले राहते. मसल्स तयार करण्यासाठी प्रोटीन गरजेचं आहे. मजबूत स्नायूंमुळे केवळ दैनंदिन कामे करणे सोपे होत नाही तर चयापचय क्रिया देखील वाढते. ज्यामुळे पोटाचे विकार दूर राहतात.
दुग्धजन्य पदार्थ आणि पालेभाज्या :
दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमचा नैसर्गिक स्त्रोत आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. जे आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यासह पालेभाज्यांमध्ये देखील कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते.
सोयाबिन आणि शेंगदाणे :
सोयाबिनमध्ये कॅल्शियमसह प्रोटीन देखील आढळते. त्याचप्रमाणे बदाम, अक्रोड, पिस्ता आणि चिया बियांमध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असतात. आपण स्नॅक्स म्हणून या दोन्ही गोष्टी खाऊ शकता.
डाळी :
विविध प्रकारच्या डाळींमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. शिवाय तीळ आणि गूळ यांचे मिश्रण खाल्ल्यानेही हाडे मजबूत होतात. आपण आपल्या आहारात नियमित डाळींचा समावेश करू शकता.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |