08:22pm | Apr 18, 2024 |
सातारा : महायुतीचे सातार्याचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा अर्ज गुरुवारी भव्य शक्ती प्रदर्शनाने दाखल करण्यात आला. उदयनराजे यांना पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या सहा विधानसभा मतदारसंघाचे समर्थक मोठ्या प्रमाणावर सातार्यात जमले होते. यावेळी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये पाच हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला. उदयनराजे यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः सातार्यात दाखल झाले होते.
महायुतीच्या वतीने सातार्याची जागा भाजपच्या पदरात पडल्यानंतर बाराव्या यादीमध्ये भाजपच्या केंद्रीय सुकाणू समितीने उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब केले. उदयनराजे यांच्या शक्ती प्रदर्शनाचे सूक्ष्म नियोजन उदयनराजे मित्र समूह आणि सातारा विकास आघाडीच्या वतीने करण्यात आले होते. जलमंदिर ते गांधी मैदान यादरम्यान बैलगाडी मधून उदयनराजे यांची रॅली काढण्यात आली. शुक्रवार पेठेतील मरीआई माता मंदिराच्या कोपर्यावर या बैलगाडीमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजी नंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या बैलगाडीवर स्वार झाले. शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे, यांच्यासह अतुल भोसले हे सुद्धा बैलगाडीत स्वार झाले आणि जलमंदिर पासून ते गांधी मैदानापर्यंत उदयनराजे आगे बढो हम तुम्हारे साथ है, आले रे आले राजे आले, अशा घोषणांनी जलमंदिर चा परिसर दणाणला. ढोल ताशांचा गजर पारंपारिक वेशातील मावळे यामुळे उदयनराजे मिरवणुकीला पारंपारिक बाज मिळाला.
गांधी मैदानावर आल्यानंतर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी उदयनराजे भोसले यांचे औक्षण केले. यावेळी भाजपचे कमळ चिन्ह असलेला फुलांनी सजवलेल्या रथ तयार करण्यात आला होता. या रथावर उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे, पालकमंत्री शंभूराज देसाई, लोकसभा प्रभारी अतुल भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आनंदराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शिंदे समर्थक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, उदयनराजे मित्र समूहाचे काका धुमाळ, लोकसभा संयोजक सुनील काटकर, चंद्रकांत पाटील, विनित पाटील, संदीप शिंदे, गणेश भिसे, सौरभ सुपेकर, तर दुसर्या रथामध्ये श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णा पाटील, जिल्हाध्यक्ष चित्रलेखा माने कदम, युवा आघाडीच्या सुरभी कदम, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, गीतांजली कदम आदी उपस्थित होते.
रॅली गांधी मैदानावरून राजपथाच्या दिशेने मार्गस्थ झाली त्यावेळी तरुणाईने जोरदार जल्लोष केला. तत्पूर्वी युवकांची बाईक रॅली काढण्यात आली होती. गांधी मैदानावर भर तळपत्या उन्हामध्ये हजारो समर्थकांचा जथ्था जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने चालू लागला. रॅली मोती चौकए देवी चौकए कमानी हौद तेथून शेटे चौकातून कर्मवीर पथावरून पोवई नाक्याकडे मार्गस्थ झाली. सातारा शहरात ठिकठिकाणी उदयनराजे यांच्या रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत झाले.
दरम्यान दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तिघेही एकाच हेलिकॉप्टर मधून पोलीस कवायत मैदानावर दाखल झाले. तेथून लगेच तिघेही पोवई नाक्यावर आले. तेव्हा तेथे रॅलीचे रूपांतर अभिवादन कार्यक्रमात झाले. सर्व मान्यवरांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तेथून रॅली बांधकाम भवन येथे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी ही रॅली थांबवली.
उदयनराजे भोसले यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित दादा पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, लोकसभा प्रभारी अतुल भोसले ही ठराविक मंडळी जिल्हाधिकार्यांच्या दालनामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले. दुपारी दोन वाजून 40 मिनिटांनी उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुमारे दोन तास झालेल्या या रॅलीला प्रचंड जनसागर लोटला होता. रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे महायुतीच्या नेत्यांचा उत्साह दुणावला आहे.
उदयनराजेंचा अर्ज भरण्यासाठी जनसमुदाय लोटला. यावरुनच जनतेने ठरवले आहे की उदयनराजेंना विजयी करायचे. नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्धार, निश्चित सातारकरांनी केला आहे. प्रचंड मताधिक्क्याने उदयनराजे विजयी होतील. जनसमुदायाचा ट्रेलर झाला, आता मतदानादिवशी पिक्चर दिसेल.
विदर्भामध्ये 45 अंश सेल्सिअस तापमान असतानाही हजारो लोक महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी रस्त्यावर उतरले. मी रामटेक, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली आदी विदर्भातील दहा मतदारसंघात कडक उन्हाळा असतानाही तेथील लोकांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्रामध्ये काही सर्व्हे पुढे येत असून, महायुतीला कमी जागा मिळतील, असे अंदाज वर्तविले जात आहेत. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागच्या वेळी त्यांनी तसेच सर्व्हे दिले होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. तेव्हा 43 जागा महायुतीच्या विजयी झाल्या. ज्यांच्याकडे काम धंदा नाही, ते लोक आरोप करत आहेत. महाविकास आघाडीकडे काही काम उरले नाही. म्हणून ते आरोप करत आहेत. सरकारने गेल्या दोन वर्षात केलेली कामे लोकांसमोर आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, जेष्ठ, महिला, तरुण यांच्यासाठी कामे केली आहेत. गेल्या अनेक वर्षात जी कामे झाली नाही ती दोन वर्षात केली. 50- 60 वर्षात कॉंग्रेसला जे जमले नाही ते मोदी सरकारने 10 वर्षात केले आहेत. लोक आश्वासन देतात. पण, ते पाळत नाहीत. मोदींनी असे कधीही म्हणाले नाहीत. पुढील पाच वर्षे 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांच्या जाहिरनाम्यात शेतकरी, गरिब, युवा, महिलांना यांना प्राधान्य दिले आहेत. सर्वसामान्य गरिबांना रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. देशात मोदींची लाट निर्माण झाली आहे. पंतप्रधान कोण असा प्रश्न केला तर प्रत्येक जण मोदी मोदी म्हणतो. कारण, राहूल गांधी यांचे 52-54 वय झाले तरी मॅच्युरिटी येत नाही, हे कॉंग्रेसच म्हणत आहे. त्यांची लॉचिंग अजून यशस्वी झाले नाही.
राज्यात ‘45 पार’ महायुती असेल. लोकांमध्ये महायुतीच्या बाजूने भावना आहे. मतदार घरी बसणार्यांना, फेसबूक लाईव्ह करणार्यांना मतदान करणार की फेस टू फेस भेटणार्यांना मतदान करणार? आमचे सरकार फिल्डवर काम करणार आहे. लोकांशी संवाद साधणारे, शेतकर्यांच्या बांधावर जाणारे सरकार आहे. शेतकर्यांच्या पाठिशी आम्ही उभे राहिलो असून, शेतकर्यांना आजपर्यंत 45 हजार कोटी रुपये दिले आहेत. इतिहासत कधीच इतके पैसे मिळाले नाहीत. केंद्राने दोन हजार, राज्याने दोन हजार रुपये शेतकर्यांना दिले आहेत. त्याची पोहोचपावती लोकसभा निवडणुकीत जनता दिल्याशिवाय राहणार नाही. सातारा लोकसभा मतदारसंघात आमच्याकडे चार तगडे आमदार आहेत. येथे जनसमुदाय तुम्ही पाहिला आहे. महायुतीचा उमेदवार विजयी करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सातार्याची जनता उदयनराजेंना विजयी करेल.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
उदयनराजेंना प्रचंड मताधिक्क्य मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘400 पार’मध्ये उदयनराजे असतील.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.
मी चाळीस वर्षापुर्वीच उदयनराजेंना जनतेच्या ओटीत टाकले आहे. ओटीत टाकायला मोठे काळीज लागते. जनतेला त्यांची काळजी असून, ते मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी व्यक्त केला.
राजघराण्यावर जनतेचे प्रेम आहे. उदयनराजे हे देखील सातत्याने जनतेवर प्रेम करतात. त्यांची कामे करतात. त्यामुळेच आजही जनतेचा उत्साह दिसून येत आहे. उदयनराजेंची लोकप्रियता वाढत आहे. त्याची भीती विरोधकांना वाटत असेल.
- श्रीमंत छ. दमयंतीराजे भोसले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |