पुणे : येथील शिंदेवाडीत रविवारी (दि. २८) खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत सुरू असताना बैलगाडा घाटातच भानुदास ज्ञानोबा शिंदे, ज्ञानोबा गोविंद शिंदे व संजय रखमा शिंदे या स्थानिकांमध्ये पूर्वीच्या हाणामारीच्या व जमिनीच्या वादातून अचानक वादावादी होऊन तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये संजय रखमा शिंदे (वय ३५) यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी भानुदास ज्ञानोबा शिंदे आणि ज्ञानोबा गोविंद शिंदे यांच्यावर शिरूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलठणच्या शिंदेवाडी येथे यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत भरविण्यात आली होती. या वेळी घाटातच शिंदेवाडी येथील भावकीतील दोन कुटुंबांत वादावादी झाली.
पूर्वीच्या हाणामारीच्या वादातून त्यांच्यात कायम शिवीगाळ होत होती. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये संजय रखमा शिंदे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भानुदास शिंदे आणि ज्ञानोबा शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाणामारीनंतर बैलगाडा शर्यत बंद :
या हाणामारीनंतर येथील बैलगाडा शर्यती तातडीने बंद करण्यात आल्या. या भांडणाचा बैलगाडा शर्यतीशी कुठलाही संबंध नसल्याचे यात्रा कमिटीकडून जाहीर करण्यात आले आहे. संजय शिंदे यांचे निधनाने शिन्देवाडी परिसरामधे दुखःचे वातावरण आहे संजय यांचे पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी आई, वडील व एक भाऊ आहे
मनमिळाऊ स्वभावाचे संजय याचे निधनाने संजय याचे मित्र परिवारामधे व परिसरामधे अवकळा पसरली आहे.
एसटी आगाराला चालकांच्या रिक्त पदाचे ग्रहण |
महाबळेश्वरमध्ये उन्हाळी सुट्टीचा हंगाम बहरला |
सातारा जिल्ह्यात पुढील पाच दिवस वादळी पाऊस |
सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता |
सांगलीची सिंचन मागणी कमी झाल्याने कोयनेतून पाणी विसर्ग कमी |
सातारा कारागृहातील बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न |
पालिका हद्दीतील धोकादायक होर्डिंग हटवा |
बारावीचा आज ऑनलाईन निकाल |
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्याला पावसाने झोडपले |
जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा दि. 24 पासून |
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा कारागृहातील बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न |
पालिका हद्दीतील धोकादायक होर्डिंग हटवा |
बारावीचा आज ऑनलाईन निकाल |
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्याला पावसाने झोडपले |
जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा दि. 24 पासून |
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |