03:54pm | May 21, 2024 |
कराड : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी आगाराला चालकांच्या रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे उपलब्ध चालकांवर एसटीचा भार पडत असून, त्यामुळे एसटी आगाराला अनेक गावच्या फेऱ्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार व विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना इतर दळणवळणाचे साधनच नसल्यामुळे दररोज चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
विद्यार्थ्यांनी एसटीकडून सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून दिले जातात. त्यासाठी विद्यार्थी अगोदर एक किंवा तीन महिन्याचे पैसे भरतात. त्यानंतर त्यांना पास दिला जातो. सध्या शाळा महाविद्यालये बंद असली, तरी क्लाससह अन्य अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
एसटीचा पास असूनही त्यांना दररोज सकाळी ग्रामीण भागातून सुमारे चार ते पाच किलोमीटर चालत मुख्य मार्गावर यावे लागते. तेथे वाट पाहात थांबून बस मिळाल्यावर संबंधित ठिकाणी पोचावे लागत आहे. या कटकटीला वैतागून काही विद्यार्थी हे खासगी वाहनाने प्रवास करून जात आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना दुहेही आर्थिक भुर्दंड बसत आहे.
सध्या प्रवाशांच्या संख्या हजारात आणि एसटी बसची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत अशी स्थिती आहे. एसटीने खासगी वाहनांनी जाणारे प्रवासी महामंडळाच्या बसकडे वळविण्यासाठी अनेक उपक्रम राबवून प्रयत्न केले. त्याद्वारे त्यांना चांगले यशही मिळून प्रवासी संख्याही वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत एसटी महामंडळाने प्रवासी वाहतुकीसाठी बसची संख्या वाढविलेली नाही.
सवलतीमुळे प्रवाशांची गर्दी :
एसटी महामंडळाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ६५ वर्षांवरील सर्वांना अर्ध्या तिकिटात प्रवास, अपंग व अन्य प्रवाशांना एकचतुर्थ्यांश सवलत, विद्यार्थी-विद्यार्थिनींना सवलतीचे पास, महिलांना अर्धे तिकीट आदींसह अन्य प्रवास सवलती दिल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा सध्या वाट पाहीन; पण एसटीनेच जाईन हे ठेका सुरू झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढून एसटीच्या उत्पन्नातही भर पडली आहे.
कराड आगाराकडे ३३ चालकांची पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर दररोज आजारपणासह अन्य काही कारणामुळे सात ते आठ चालक गैरहजर असतात. त्यामुळे उपलब्ध चालकांची बेरीज करून प्रवासी वाहतुकीच्या एसटीच्या फेऱ्या चालवाव्या लागतात. चालकांअभावी काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. - विक्रम हांडे, आगार व्यवस्थापक
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |