सातारा : दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अर्थात महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटन स्थळाला पर्यटकांची भेट देण्यासाठी अक्षरशः चढाओढ लागते. दरवर्षी राज्याचे राज्यपाल ही शासकीय दौऱ्यानुसार पाच दिवस सातारा जिल्ह्यातील या थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वरच्या राजभवन येथे येऊन या उन्हाळी पर्यटनाचा आनंद लुटतात.
आता यावर्षी महाबळेश्वर, पाचगणी तसेच लगतच्या तापोळा, बामनोली, वाई, कास या पर्यटन स्थळावर ही पर्यटकांची विशेष गर्दी होऊ लागली आहे. वाढत्या उन्हाचा चटका पर्यटकांना बसू नये यासाठी महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत पालिका आणि परिसरातील व्यापारी बंधूंनी पर्यटकांना सावलीतून ये-जा करावी यासाठी हिरव्या शेडनेटचा नजारा अर्थात अच्छादनच संपूर्ण बाजारपेठेवर घातल्याचे दिसून येत आहे. लाल चुटूक स्ट्रॉबेरी, मलबेरी, गुजबेरी, छोटी छोटी करवंदे जांभळे, आळवं, कोकम, तोरण यासारख्या रानमेवा ही सध्या या परिसरात परिसरातील ग्रामस्थ विक्रीसाठी घेऊन येत आहेत. याचप्रमाणे गुलाबी मुळे, लाल चुटूक गाजरे यांचे थेलेही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
पर्यटन म्हणाले की आनंदाला उधाणच येते, त्यामुळे या साबणे रोडवर मुख्य बाजारपेठ परिसरात मस्त धुंद वातावरणात थंड हवेत, खरेदी करत आणि तोंडात महाबळेश्वरी चणे फुटाणे टाकत, आस्वाद घेत या परिसरातील पर्यटक रात्री उशिरापर्यंत फिरताना दिसून येतात. तसेच या मार्गावर असलेले पाणीपुरी, भेळपुरी आणि बर्फाचा गोळा, गरमागरम मक्याच्या कणसाचे विविध प्रकार स्ट्रॉबेरी टॉपिंग, स्ट्रॉबेरी क्रीम विथ आईस्क्रीम अनुभवण्यासाठीही पर्यटक येथे गर्दी करताना दिसतात. महाबळेश्वराच्या स्थानिक बाजारपेठेत बनवलेले कंगवे, फणी, त्याचप्रमाणे कोल्हापुरी चपला, लाकडी काठ्या खरेदीसाठी ही गर्दी होताना दिसते.
या बाजारपेठेत अनेक नामवंत कंपन्यांच्या उलन स्वेटर, टोप्या, मफलर्स, रग, रजया, बेडशीट, उषांचे तसेच तकयांचे कव्हर्स खरेदीसाठीही पर्यटक गर्दी करतात दुपारच्या वेळेस परिसरातील 12 स्थानिक पर्यटन स्थळ पॉईंट, आणि दोन ऐतिहासिक शिवमंदिरे आणि पंचगंगा मंदिराला भेट देऊन सायंकाळचे वेळी वेण्णालेक येथील नौका विहाराचा आनंद पर्यटक घेताना दिसतात. याच ठिकाणी असणारी घोडे स्वारी व विविध प्रकारच्या मनोरंज खेळाचा आनंद लुटून वेण्णालेक परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यानात फोटोग्राफीसाठी आपला काही क्षण दवडतात. सुमारे तीन दिवसांची ही मनमोराद आनंद देणारी ट्रीप एन्जॉय करताना पर्यटक लगतच्या पाचगणी येथील टेबल लँड, पार्शी पॉईंट, गुहा हा नजारा अनुभवून तापोळा येथे शिवसागर जलाशयात नोका विहार करतात बामणोली तसेच परिसरातील निसर्गरम्य अशा परिसराचा आनंद लुटतात आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |