02:21pm | May 21, 2024 |
सातारा : मॉन्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर सर्वांचे लक्ष मॉन्सूनच्या पावसाकडे लागले आहे. मात्र, राज्यात मागील १० ते १२ दिवसांपासून वेगवेगळ्या भागात वळवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी वादळी पाऊस, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मान्सूनने दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात प्रगती केली आहे, तर अंदमानात दाखल झालेला मॉन्सून यंदा ३१ मे पर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता आहे; पण पूर्व मोसमी पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला.
मागील १० ते १२ दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत वादळी पाऊस होत आहे. हवामान विभागाने आणखी पुढील पाच दिवस जिल्ह्यातील काही भागांत पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने मंगळवारी साताऱ्यासह कराड, पाटण, महाबळेश्वर, खंडाळ्यामध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. बुधवारी आणि गुरुवारीही जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
दरम्यान, वळवाच्या पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी चांगल्या पावसाची प्रतीक्षा असली, तरी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |