05:09pm | Apr 30, 2024 |
सातारा : सातारा जिल्हा बँकेचे माजी अधिकारी मधुकर तावरे यांचा मुलगा सुमित तावरे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल सातारा जिल्हा बँकेच्या वतीने सत्कार करणेत आला. बँकेचे अध्यक्ष मा. नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रभाकर घार्गे, दत्तात्रय ढमाळ, राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, शिवरूपराजे खर्डेकर, सुनील खत्री, ज्ञानदेव रांजणे, रामराव लेंभे, सुरेश सावंत, संचालिका सौ. कांचन साळुंखे, सौ. ऋतुजा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे यांचे उपस्थितीमध्ये यथोचित सत्कार करणेत आला.
यावेळी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील म्हणाले, बँकेचे माजी अधिकारी मधुकर तावरे यांचे चिरंजीव सुमित तावरे याने युपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतातून साडेसहा लाख विद्यार्थ्यांमधून ६५५ वी रँक पटकावून सनदी अधिकारी पदावर मोहोर उमटवली ही बाब कौतुकास्पद असून सातारा जिल्ह्याचे नाव उज्वल केले असलेचे सांगून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अनिल देसाई म्हणाले, युपीएससीची परीक्षा देशात सर्वात अवघड मानली जाते. सुमितचे कॉलेज पर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागातच झाले असून त्याने सीईटी परीक्षेत चांगले मार्क मिळवून पुण्याच्या सीईओपी कॉलेजला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळवला आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. आई आणि वडिलांचे प्रेरणेने बौद्धिक क्षमतेच्या जोरावर यश मिळवलेचे सांगून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, ग्रामीण भागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न केल्यावर निश्चित यश मिळते. सुमितचे वडील बँकेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. भारतातून साडेसहा लाख विद्यार्थ्यांमधून ६५५ वी रँक पटकावून सनदी अधिकारी पदावर मोहोर उमटवली. या परीक्षेत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या तुलनेत महाराष्ट्रातील मुले मागे असतात. मराठी मुलांना आपले राज्य सोडून केंद्रीय पातळीवर नोकरी करायची मानसिक तयारी नसायची, त्यात युपीएससी म्हटले की देशभरात कुठेही बदली होणार म्हणून मराठी मुलांना या करीयरची धास्ती वाटायची. परंतू सुमितने अथक परिश्रम करून त्याच्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले. याप्रसंगी डॉ. सरकाळे यांनी सुमितचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सत्कार स्वीकारताना सुमितने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे जमणारच नाही, असा ट्रेंड आहे. मात्र जिद्दीने, चिकाटीने अभ्यास करून प्रयत्न केल्यास काहीही असाध्य नाही.
मला तर पाचवेळा अपयश आले. त्यामुळे खचून न जाता मी सहाव्यावेळी जिद्दीने परीक्षा देऊन देशात ६५५ वी रँक पटकावली. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न केल्यावर निश्चित यश मिळते. बँकेने केलेला सन्मान कायमस्वरूपी स्मृतीमध्ये राहील.
एवढ्या वर्षांची प्रतीक्षा फळाला आली. नातेवाईक आणि गुरुजनांच्या पाठिंब्यांमुळे हे शक्य झालं आणि बँकेच्या मा. संचालक मंडळाच्या वतीने सत्कार केलेबद्दल सुमितचे वडिल श्री. मधुकर तावरे यांनी आभार मानले.
याप्रसंगी सुमित तावरे यांचे पुढील वाटचालीस बँकेचे सर्व संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी सेवक वर्ग, बँकेचे ग्राहक, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांनी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
सातारा कारागृहातील बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न |
पालिका हद्दीतील धोकादायक होर्डिंग हटवा |
बारावीचा आज ऑनलाईन निकाल |
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्याला पावसाने झोडपले |
जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा दि. 24 पासून |
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |