सातारा : सातारा डाक विभागाअंतर्गत सातारा हेड पोस्ट ऑफिस, सातारा येथे बचत खाते, जेष्ठ नागरिक बचत खाते तसेच मुदत ठेव योजनांमधील रक्कमे मध्ये अफरातफरीचा प्रकार मार्च २०२४ अखेरीस निदर्शनास / उघडकीस आला आहे. ज्या ग्राहकांच्या खात्यात अफरातफर दिसेल त्यांच्याकडून संबंधित कागदपत्रांसह दावा अर्ज घेऊन दाव्यांची नियमानुसार पूर्तता करण्यात येईल, सदर अफरातफरीचा तपास करण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे तरी सर्व ग्राहकांनी समितीस सहकार्य करावे.
सदरची अफरातफर ही श्रीमती गांधारी एम. कल्याणी, SAS Agent (MIG0014204) आणि MPKBYAgent (महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना) (MIG0014126) या Agent कडून करण्यात आलेली आहे. या दोन्ही Agencies तत्काळ बंद करण्यात आलेल्या आहेत. खातेदारांनी पुनर्गुंतवणूक करण्यासाठी विश्वासाने पैसे काढण्याच्या कोऱ्या फॉर्मवर सह्या करून एजंटकडे सुपूर्द केल्या होत्या त्याचा गैर फायदा घेवून सदर एजंट ने खातेदारांच्या ठेवी परस्पर काढून घेतल्या आणि संबंधित खातेदारांच्या ठेवींची पुनर्गुतवणूक न करता ते पैसे स्वतः वापरले अशा पद्धतीने सदर एजंट ने अफरातफर केलेली आहे, असे तपासादरम्यान प्रथम दर्शनी दिसून येते. सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी डाक कार्यालयाचे अधिकारी करत आहेत. तरी सर्व ग्राहकांना तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सतर्कता म्हणून सर्व ग्राहकांनी पुढील गोष्टींचे पालन करावे. ग्राहकांनी www.indiapost.gov.in या लिंक वरती जाऊन Banking & Remittance -> ePassbook या पर्यायावर जाऊन Registered Mobile Number द्वारे आपल्या सर्व खात्यांची Balance Inquiry, Mini Statement, Detailed Statement पाहून खात्री करावी. सदर एजंट सोबत पूर्वी केलेल्या आर्थिक व्यवहारांची खात्री सातारा हेड पोस्ट ऑफिसशी व्यक्तिशः संपर्क साधून करून घ्यावी. सर्व खातेदारांनी आपल्या खात्याला आपला मोबाइल नंबर जोडून घ्यावा. सर्व खातेधारकांनी आर्थिक व्यवहारानंतर येणाऱ्या SMS वर लक्ष ठेवावे व त्यातील व्यवहाराची खात्री करावी. आपल्या खात्यासंबंधित शंका/ समस्या असेल किंवा काही अफरातफर आढळून आल्यास सदर ग्राहकांनी प्रवर अधीक्षक, डाक विभाग सातारा, पहिला मजला, सातारा हेड पोस्ट ऑफिस बिल्डींग, सातारा-४१५००१ येथे सर्व कागदपत्र घेऊन व्यक्तिशः / टेलिफोन द्वारे (०२१६२-२३७४३७/२३७४४३) त्वरित संपर्क साधावा.
सतर्कता म्हणून सर्व ग्राहकांनी पुढील गोष्टी करणे टाळावे. श्रीमती गांधारी एम. कल्याणी, SAS Agent (MIG0014204) आणि MPKBY Agent (MIG0014126) या एजंटने अफरातफर केलेली असल्यामुळे तिच्या दोन्ही एजेन्सीस तात्काळ बंद करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सदर एजंटसोबत कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नयेत, आपले पासबूक नेहमी आपल्या सोबत ठेवावे तसेच टपाल कार्यालयात आपली असलेल्या गुंतवणूकीचे खातेपुस्तक इतर कुणाला अथवा एजंटकडे देऊ नये, पासबुकामध्ये कोठेही आपली नंमूना सही करून ठेवू नये, रक्कम जमा अथवा निकासी नंतर आपले पासबूकमध्ये शिल्लक रक्कमेची खात्री करावी, खात्यातून रक्कम काढण्याचे कोरे अर्ज वेळेआधी सही करून ठेवू नयेत अथवा एजंटला देऊ नयेत, आपल्या खात्यातून निकासीसाठी पोस्टमास्टर अथवा प्राधिकृत एजंटला संदेशवाहक म्हणून नेमू नये, आपण वरील सुचनांचे पालन करावे. सर्व ग्राहकांनी टपाल कार्यालयात केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे असे प्रवर अधिक्षक, सातारा विभाग, सातारा यांचेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एसटी आगाराला चालकांच्या रिक्त पदाचे ग्रहण |
महाबळेश्वरमध्ये उन्हाळी सुट्टीचा हंगाम बहरला |
सातारा जिल्ह्यात पुढील पाच दिवस वादळी पाऊस |
सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता |
सांगलीची सिंचन मागणी कमी झाल्याने कोयनेतून पाणी विसर्ग कमी |
सातारा कारागृहातील बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न |
पालिका हद्दीतील धोकादायक होर्डिंग हटवा |
बारावीचा आज ऑनलाईन निकाल |
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्याला पावसाने झोडपले |
जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा दि. 24 पासून |
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा कारागृहातील बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न |
पालिका हद्दीतील धोकादायक होर्डिंग हटवा |
बारावीचा आज ऑनलाईन निकाल |
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्याला पावसाने झोडपले |
जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा दि. 24 पासून |
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |