05:27pm | Apr 30, 2024 |
सातारा : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक २० मे २०२४ ते २९ मे २०२४ या कालावधीत SSB कोर्स क्र. ५७ आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.
तरी, सातारा जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा येथे दिनांक १४ मे २०२४ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील SSB ५७ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
केंद्रामध्ये एस. एस. बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवून यावेत :
कंम्बाईड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे, एनसीसी 'C' सर्टिफिकेट 'A' किंवा 'B' ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी, टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे, विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे. अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी: training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. आणि ०२५३-२४५१०३२ व भ्रमणध्वनी क्र. ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांनी केले आहे.
सातारा कारागृहातील बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न |
पालिका हद्दीतील धोकादायक होर्डिंग हटवा |
बारावीचा आज ऑनलाईन निकाल |
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्याला पावसाने झोडपले |
जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा दि. 24 पासून |
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |