01:27pm | Apr 11, 2024 |
नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल स्वरूप देत जगातील मोठ्या देशांतील २५ राजकीय पक्षांच्या नेत्यांना भारतात निवडणुका आणि सभा पाहण्यासाठी निमंत्रित केले आहे.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जगातील मोठ्या २५ राजकीय पक्षांच्या नेत्यांना देशात निवडणूक अभियान पाहण्यासाठी आणि भाजपचा निवडणूक प्रचार पाहण्यासाठी देशात बोलविले आहे. यातील १५ राजकीय पक्षांनी आपली सहमती दर्शविली आहे आणि आपल्या नेत्यांना भारतात सार्वत्रिक निवडणुका आणि पंतप्रधान मोदी यांच्या सभा पाहण्यासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक आणि भ्रष्टाचार हे दोन समानार्थी शब्द आहेत. द्रमुक द्वेष आणि विभाजनवादी राजकारण करत आहे, पक्षाला राज्याच्या विकासाची काळजी नाही. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
कोण कुठून येणार?
ब्रिटनची कंजर्व्हेटिव्ह आणि लेबर पार्टी, जर्मनीतील ख्रिश्चियन डेमोक्रॅटिक आणि सोशल डेमोक्रॅट पार्टी, फ्रान्सची द रिपब्लिकन्स आणि नॅशनल रेली, जपानची लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी, इस्रायलची लिकुड, ऑस्ट्रेलियाची ऑस्ट्रेलियन लेबर पार्टी, रशियाची युनायटेड रशिया पार्टी, बांगलादेशमधील अवामी लीग यांचा समावेश आहे. नेपाळ आणि श्रीलंकेतील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे.
भाजपचा परराष्ट्र मंत्रालय विभाग करणार पाहुण्यांची व्यवस्था :
भाजपचा परराष्ट्रविषयक विभाग आणि परराष्ट्र मंत्रालय विदेशातून येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था करणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विशेष ठिकाणांवरील सभा आणि रोड शो पाहण्यासाठी हे नेते जातील.
nनिवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात म्हणजे पुढील महिन्यात मेमध्ये हे नेते देशात दाखल होतील. या नेत्यांसोबत भाजपच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या टीम राहतील.
त्या या नेत्यांना निवडणुकीबाबत माहिती देतील. भाजपचे अध्यक्ष नड्डा या नेत्यांसोबत चर्चा करतील. तसेच, त्यांच्या स्वागतासाठी डिनरचे आयोजन करतील.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |