03:41pm | Apr 22, 2024 |
सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा यांच्यामार्फत ज्ञानश्री अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा येथे दि. 16 एप्रिल 2024 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिरामध्ये 197 विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये डॉ. योगेश गवळी यांच्या मार्फत अवयवदान व डॉ. यशवंत कुलकर्णी यांचे मार्फत देहदान याबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डॉ. निलम सोनावणे व डॉ. जगदीश चांडक यांनी विद्यार्थ्यांची मुख आरोग्य तपासणी केली. अरुणा कराड यांनी विद्यार्थिनींना 'मासिक पाळी व स्त्री आरोग्य' या विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. बी. चव्हाण, डॉ. नलिनी काडगी, डॉ. प्रितीश राऊत, डॉ. कल्पक कदरकर तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रोहित वांगडे, सचिव व ए. डी. जाधव, प्राचार्य हे उपस्थित होते.
दि. १५ एप्रिल २०२४ रोजी महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते." रक्तदान करुया आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवूया" हि सामाजिक भावना मनाशी बाळगून एकूण ४३ विद्यार्थी, कर्मचारी व उत्साही रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीराचे उदघाटन मा. अधिष्ठाता डॉ. रविंद्रनाथ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. या प्रसंगी अधिष्ठातांनी रक्तदानाचे महत्त्व सांगून विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहित केले. डॉ. नलिनी काडगी (विकृतीशास्त्र विभागप्रमुख) व डॉ. सरिता डाखुरे (रक्तकेंद्र प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर पार पडले. तसेच यावेळी डॉ. वैशाली डोहे, डॉ. भारती दासवानी, डॉ. योगेश गवळी व इतर अध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. मा. अधिष्ठाता डॉ. रविंद्रनाथ चव्हाण यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण होऊन शिबीराची सांगता झाली.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |