08:32pm | May 02, 2024 |
सातारा : लोकशाहीच्या उत्सवांमध्ये सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी शंभर टक्के मतदान करावे, ही मागणी घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातारा जिल्हा यांचे वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी जनजागृती अभियान सुरू आहे. अखिल प्रबोधन मंचाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील सातशेहून अधिक गावांमध्ये मतदार जनजागृतीचा अभियान राबवण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांत मंत्री अनिल ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सातारा जिल्हा तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्यप्रमुख विघ्नेश घोरपडे व यशदा टेक्निकल कॅम्पस चे प्रमुख शुभम भिकनर उपस्थित होते.
ठोंबरे पुढे म्हणाले, भारताने आपल्या यशस्वी निवडणूक प्रक्रियेद्वारे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे यशस्वी प्रदर्शन केले आहे. भारताची बळकट लोकशाही व्यवस्था आणि निवडून आलेले मजबूत सरकार हे यशस्वी लोकशाहीचे उदाहरण आहे. भारतातील मतदारांच्या जागृतीमुळे आणि भारताच्या निवडणूक प्रक्रियेमुळे लोकशाहीने घालून दिलेल्या संविधानात्मक गोष्टी शक्य झाल्या आहेत. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये मतदानाचा टक्का हा 60 टक्के पेक्षा अधिक जात नाही. त्यामुळे सातारा जिल्ह्यात यंदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गावागावांमध्ये प्रबोधन मोहीम राबवण्यात येत असून नागरिकांनी मतदान करावे यासाठी प्रत्यक्ष संपर्क मोहीम राबवण्यात येत आहे.
ही मोहीम सातारा जिल्ह्यातील 700 हून अधिक गावांमध्ये सुरू असून मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. लोकशाहीला यशस्वी करण्यामध्ये मतदार राजा मोठी भूमिका पार पाडत असतो. निवडणुकीत मतदान करून जागरूक नागरिक होण्याची कर्तव्य पार पाडूया आणि एक सक्षम मजबूत सरकार बनवूया. याकरिता मतदार राजाने आपल्या मतदान हक्काविषयी जागरूक राहणे गरजेचे आहे, असे आवाहन अनिल ठोंबरे यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
पेन्शनर वयोवृद्धाला ठकवणार्या भामट्याला सातारा पोलिसांकडून अटक |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
पेन्शनर वयोवृद्धाला ठकवणार्या भामट्याला सातारा पोलिसांकडून अटक |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |