09:33pm | Sep 09, 2021 |
सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकींचे नगारे वाजू लागले आहेत. असे असतानाच काल रात्री सातारा पालिकेचा नगरसेवक विनोद उर्फ बाळु खंदारेने आपल्या 20-25 समर्थकांना बरोबर घेवून खा. उदयनराजे गटाचा कार्यकर्ता सनी मुरलीधर भोसले याच्यासह काहीजणांवर खुनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सनी भोसलेसह तीन-चारजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सातार्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी बाळूसह १६ जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गेल्याच वर्षी मोक्क्यातून जामीनावर सुटलेल्या बाळु खंदारेने शेवटी आपली लायकी दाखवून देत मी कधीही सुधारणार नाही, असे आव्हान सातारा पोलिसांना दिले आहे.
सुमारे तीन वर्षांपूर्वी कोजागिरीच्या रात्री सातार्यातील थोरली व धाकल्या पात्यांनी एकमेकांच्या विरोधात हत्यारे परजली होती. छत्रपती घराण्याला खरेतर ही न शोभणारी घटना. परंतू मनोमिलन तुटल्यानंतर मनात धगधगणारी आग सुरुची राड्याच्या माध्यमातून बाहेर पडली. या धुमश्चक्रीत थोरल्या व धाकल्या वाड्यावर असणारे अनेक रथी-महारथी गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी नाड्या आवळताच अनेकजण अटकेच्या भीतीने भूमिगत झाले होते. सातारच्या पोवईनाक्यावर दे माय-धरणी ठाय करुन सोडणार्या दोन्ही वाड्यांवरील कार्यकर्त्यांच्या पार्श्वभागावर गार उभी राहिली होती. पोलिसांनी खाक्या दाखविल्यानंतर मी मी म्हणनारे अनेक सुधारले. परंतू याला अपवाद असणारा नगरसेवक बाळु खंदारे मात्र सुधारला नाही. कुप्रसिद्ध, अवैध खासगी सावकार खंड्या उर्फ प्रमोद धाराशिवकर याचा बाळु पार्टनर. या दोघांनी अवैध खासगी सावकारीच्या माध्यमातून सातारा धुवून खाल्ला. खंड्याच्या अनेक अनैतिक भानगडींना बाळुने पाठबळ दिले. शेवटी तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्कास्त्र डागत बाळु-खंडु टोळीला जेलात घातले. परंतू खंड्या राहिला, ‘कंडिश्नल बेल’ मिळवून बाळु बाहेर आला. वार्डात करीत असलेल्या समाजकारणाने अनेकजण बाळु सुधारला, असे म्हणत होते. मध्यंतरी, कोविड वार्ड उभारुन, अनेकांच्या सुश्रुषा करुन जीवनदान देण्याचे कार्य झाले. बाळुच्या या दानशुर वृत्तीमुळे तो पोलिसांच्या 'गुड बुक' मध्ये आला. परंतू 'कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच राहणार, या पद्धतीने बाळुने काल रात्री आपला ट्रेलर सातारकरांना पुन्हा दाखवून दिला.
सनी भोसले हा माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर भोसल्यांचा सुपुत्र. मुरलीधर भोसल्यांच्या जलमंदिरवरील वजनाने तो तिकडे झुकला. मालकांच्या पुढे-मागे करुन संपूर्ण महाराष्ट्रात मी महाराजांच्या घरातलाच, अशी ख्याती पसरवली. दुकानांच्या उद्घाटनापासून अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना सनी प्रमुख पाहुणा म्हणून सनी हजेरी लावू लागला. मालक पुढे, सनी मागे किंवा सनी पुढे आणि मालक मागे, यामुळे सनी सातार्यातील तरुणाईचा ‘भाई’ झाला. परंतू सनीची वाढती पब्लिसीटी बाळुच्या पचनी पडली नाही. आठ वर्षापूर्वी पंताच्या गोटात असलेल्या गिते बिल्डिंगसमोर बाळुने झाडलेली गोळी सनीच्या कानाजवळून सूऽऽसू करीत गेली. दोन दिवस कान बधीर झाला होता. परंतू तिच गोळी एक इंच अलिकडे आली असती तर सनीचा कपाळमोक्ष निश्चित होता. या प्रकरणानंतर बाळुला अटक झाली. गोळीबारात बाळुने वापरलेले पिस्तुल चुंबक झिजले तरी ते पोलिसांना सापडले नाही. बाळुनेही दोन-चार दिवस पोलिसांचा सरकारी पाहुणचार घेतला. शेवटी झाले गेले गंगेला मिळाले, यानुसार सातार्यातील दोन-चार मांडवली किंगनी बाळु-सनीच्यामध्ये दिलजमाई केली. दोघांनीही पोलीस मुख्यालयाला साक्षी मानून एकमेकांच्या गळाभेटी घेतल्या. परंतू या दोघांमध्ये कोल्ड वॉर सुरुच होते. त्याचा विस्फोट कधी ना कधी होणारच होता, तो काल रात्री झाला. राज्याचे गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांचे वास्तव्य सातारा शहरात असते. मंत्री झाल्यापासून सातार्यात घडणार्या बारीकसारीक गोष्टीवर त्यांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांपासून साध्या कॉन्स्टेबलपर्यंत अनेकजण दडपणाखाली असतात. असे असतानाच नगरसेवक बाळु व त्याच्या कार्यकर्त्यांनी काल रात्रीचा खुनी हल्ला घडवून आणला. लाठ्या-काठ्या, तलवारी-गुप्ती यांसह रिव्हॉल्व्हरचाही वापर करण्यात आला. संध्याकाळी आठ वाजता राजपथावर वर्दळ असते. गणेशोत्सव एका दिवसावर येवून ठेपला असताना सातारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकार्यांनी शस्त्रबंदीचे आदेश दिले आहेत. असे असतानाच नगरसेवक बाळु व त्याच्या गँग ने हा आदेश फाट्यावर मारत आमची कोणीही वाकडी करीत नाही, असे म्हणत कायदा व सुव्यवस्थेला कोलदांडा घालण्याचे काम केले आहे.
सातार्यातील कळवंडींचा आनेवाडी हा केंद्रबिंदु राहिलेला आहे. तीन वर्षापूर्वी सुरुची राडा प्रकरण टोलनाक्याच्या वादातून घडले होते. हाच टोलनाका सध्या खा. उदयनराजेंचे कट्टर समर्थक चालवित आहे, असे ऐकिवात आहे. त्या समर्थकांमध्ये सनीचे नाव आघाडीवर आहे. टोलनाक्यातील वसुलीचे पैसे खिशात खुळखुळल्यानंतर अनेकांना मस्ती येते, हे यापूर्वी सातारकरांनी याची देही, याची डोळा पाहिलेले आहे. भोसल्यांचा सनी हा तरी त्याला कसा अपवाद असावा? इंचभर लांबीच्या कॉलरचे शर्ट घालून कोणी सुलतान मिर्झा, दाऊद, छोटा राजन होत नाही. दिवाळीच्या फटाक्यांचा आवाज आल्यानंतर अनेकजण शेपूट घालून पळ काढतात. अशांना आपण अंडरवर्ल्ड डॉन झाल्याचे साक्षात्कार होवू लागलेत. मोक्के लागूनही ते सुधारण्याचे नाव घेत नाहीत. तत्कालीन मोक्का किंग पोलीस अधीक्षक संदीप पाटलांनी मोक्कास्त्र उगारुन मी-मी म्हणार्यांच्या पुंग्या टाईट केल्या होत्या. संदीप पाटलांनंतर मोक्क्याचा मुक्तहस्ते वापर न झाल्याने बाळु-सनी सारखे अनेक गल्लीभाई पुन्हा शेफारलेले आहेत. अशांना पुन्हा दोन-चार वर्षे जेलची हवा खायला लावणे गरजेचे आहे. सातारा पालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. सातारच्या थोरल्या आणि धाकल्या पातींमध्ये मनोमिलनाचे सूर जुळणार नाहीत. त्यामुळे येणार्या काळामध्ये सातारच्या राजघराण्यातील लढाई अधिक टोकदार होणार आहे. या टोकदार लढाईत दोन्ही बाजुंचे कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडून रक्तबंबाळ होणार आहेत. सातारा पालिकेचा गड कोणीही सर करो, परंतू सातारा शहरातील कायदा व सुव्यवस्थता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. त्यामुळे एसपी साहेब, आपण बघताय काय? काढा पेपर लावा मोक्के !
थोडी वर्जिश किजिए, रिझल्ट मिलेगा !
तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रसन्नांपासून सातपुतेंपर्यंत सातारा पोलीस दलाची हवा होती. पुण्या-मुंबईच्या तुलनेत सातार्याचा क्राईम रेट तसा नगण्यच. परंतू सातार्यातील काही नग कधी काय करतील, याचा नेम नसतो. सगळेकाही सुरळीत सुरु असतानाच एकदम आगडोंब उसळतो आणि हा आगडोंब शमविता शमविता पोलिसांची दमछाक होते. सातार्यातील गुंडगिरी संपविण्यासाठी पिस्तुल हातात घेवून रस्त्यावर उतरणे गरजेचे नसते तर पेन आणि कागदाच्या माध्यमातूनही आम्ही गुंडांची ठासतो, हे संदीप पाटलांनी आपल्या कृतीतून राज्याला दाखवून दिले. पेनाच्या आणि कागदाच्या माध्यमातून रंगविलेल्या चार्जशीटच्या माध्यमातून अनेकजण सध्या मोक्का म्हणजेच संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये जेलचे वासे मोजताहेत. त्यामुळेच बन्सल साहेब, थोडी वर्जिश किजिएगा, रिझल्ट तो अपने आप मिल जाएगा !
- संग्राम निकाळजे
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |