मुंबई : मुंबई उपनगरातील ४ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने तब्बल ४२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सोमवारपासून सुरुवात झाली असून १५ एप्रिलपर्यंत विविध विधानसभा मतदारसंघात प्रशिक्षणे सुरू राहणार आहेत. मुंबईमधील मतदारसंघांतील मतदानाला दीड महिन्याहून अधिक काळ असला तरी निवडणूक आयोगाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू झाली आहे.
१) मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण २६ विधानसभा मतदारसंघ आहे.
२) दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातील अनुशक्तीनगर आणि चेंबूर हे दोन विधानसभा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात मोडतात.
२६ ठिकाणी प्रशिक्षण घेतले जाणार :
मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघ असल्याने निवडणूक विभागाकडून नियोजन आखण्यात आले.एकूण ७,३५३ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे ४२ हजार मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. त्यांचे तीन टप्प्यात प्रशिक्षण घेतले जाणार असून पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण १ एप्रिलपासून सुरु झाले आहे. त्यामध्ये केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे.
यात ईव्हीएमचा वापर, निवडणुकीचे नियम, कायदे आणि कार्यपद्धती यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण दिवसाचे असेल. मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ ठिकाणी हे प्रशिक्षण घेतले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडणूक कामाला दांडी मारणाऱ्यांवर गुन्हे :
कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. या प्रशिक्षणाला उपस्थित न राहणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |